Wednesday, January 24, 2018
Friday, January 19, 2018
Friday, January 12, 2018
अत्यंत महत्वाची नोटीस
अत्यंत
महत्वाची नोटीस दि.१२/०१/२०१८
ऑनलाईन
प्रक्रिया सन २०१७-१८ या मुंबई उपनगर, शालेय क्रीडा स्पर्धेत ऑनलाईन मध्ये ज्या
शाळांनी रजिस्टेशन केले आहे त्यांनी आपल्या खेळाडूची माहिती (मराठीत) परत तपासणी
करून योग्य तो बदल २१ जानेवारी २०१८ पूर्वी
करणे महत्वाचे आहे याची नोंद घ्यावी. अन्यथा प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) प्रिंट झाल्यावर कोणताही बदल करता येणार नाही
याची गांभीर्याने नोंद घ्यावी व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा शिक्षक यांची
राहील.
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर
काही अडचण असल्यास माहितीसाठी संपर्क
क्र. ९८६७५६१६२३-प्रवीण
बनवलीकर
Tuesday, January 9, 2018
राज्य युवा प्रशिक्षण शिबीर सन 2017-18 कार्यक्रम.
राज्य युवा प्रशिक्षण शिबीर सन 2017-18
कार्यक्रम.
मुंबई विभागामार्फत 10 दिवसांचे निवासी राज्य युवा
प्रशिक्षण शिबीर दि.18 ते 27 जानेवारी 2018 रोजी न्युझलॅड होस्टेल, आरे वसाहत,
गोरेगाव पूर्व ,मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबीरात निवास व भोजन
व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये जीवन कौशल्य,रोजगार मार्गदर्शन,शासकीय योजना,
कायदेविषयक माहीती, युवकांसाठी आरोग्य, समुपदेशन, भारताचा इतिहास,अर्थव्यवस्था,चालू
घडामोडी,पर्यावरण व अनुषगिक इंतर विषयांचा समावेश आहे.
यासाठी मुंबई उपनगर जिल्हयातील इच्छुक प्रशिक्षणार्थींची
नावे मागविण्यात येत आहेत.तरी नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय छात्र सेना, एनएसएस,जिल्हयातील
युवा संस्था व शाळा – महाविदयालये यांनी त्यांचेकडील इच्छुक प्रशिक्षणार्थींची
नावे त्वरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दोन दिवसात हस्ते अथवा ईमेलवर पाठविण्यात
यावीत.
Monday, January 8, 2018
क्रीडा गुण सवलत
क्रीडा गुण सवलत
इयत्ता
१० वी व इयत्ता १२ वी परीक्षेस बसलेल्या व मान्यताप्राप्त राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना यापूर्वी अंतिम परीक्षेस नापास झाल्यास
सवलतीचे २५ गुण फक्त उत्तीर्ण होण्याकरिता देण्यात येत होते.
तथापी शासनाने दि.२१
एप्रिल २०१५ च्या सुधारित शासन निर्णयानुसार फक्त अनुतीर्ण खेळाडूंनादेण्यात
येणारी सवलत गुणाची तरतूद बंद करून इयत्ता १० १२ च्या परीक्षेस बसलेल्या
खेळाडूंना खालीलप्रमाणे सुधारित सवलत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
१)क्रीडा विभागाद्वारा
आयोजित राष्ट्रीय स्पर्धा प्राविण्य -२५ गुण
२) क्रीडा
विभागाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धा सहभाग व राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य-२०
३) क्रीडा
विभागाद्वारा आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा सहभाग -१५ गुण
४)अधिकृत संघटनेच्या
आंतरराष्ट्रीय सहभाग व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य -२० गुण
५) अधिकृत
संघटनेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व राज्य स्पर्धेत प्राविण्य-२०गुण
६) अधिकृत
संघटनेच्या राज्य स्पर्धेत सहभाग-१५ गुण
Saturday, January 6, 2018
राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा पूर्व शिबीर व स्पर्धा २०१७-१८
राष्ट्रीय शालेय मैदानी (१४ वर्षे मुले/मुली) क्रीडा स्पर्धा पूर्व शिबीर व स्पर्धा २०१७-१८
शिबीर कालावधी -१२ ते १७ जानेवारी २०१८
उपस्थिती वेळ-११ जानेवारी २०१८ रोजी
शिबिराचे ठिकाण -श्री.विठ्ठल जोशी चॅरीटेबल ट्रस्ट चे क्रीडा संकुल डेरवण, ता.चिपळूण, जी.-रत्नागिरी
स्पर्धा दि.१८ ते २१ जानेवारी २०१८
अधिक माहितीसाठी संपर्क क्र.अरुण जितेकर -क्रीडा अधिकारी ९८१९७०२०७०
सबंधित स्पर्धकांनी जिल्हा क्रिडा अधिकारी मुंबई उपनगर ,कांदिवली -पु. या कार्यालयाशी संपर्क साधून आपले पत्र घेऊन जावे.
संपर्क क्र.-२८८७११०५
शिबीर कालावधी -१२ ते १७ जानेवारी २०१८
उपस्थिती वेळ-११ जानेवारी २०१८ रोजी
शिबिराचे ठिकाण -श्री.विठ्ठल जोशी चॅरीटेबल ट्रस्ट चे क्रीडा संकुल डेरवण, ता.चिपळूण, जी.-रत्नागिरी
स्पर्धा दि.१८ ते २१ जानेवारी २०१८
अधिक माहितीसाठी संपर्क क्र.अरुण जितेकर -क्रीडा अधिकारी ९८१९७०२०७०
सबंधित स्पर्धकांनी जिल्हा क्रिडा अधिकारी मुंबई उपनगर ,कांदिवली -पु. या कार्यालयाशी संपर्क साधून आपले पत्र घेऊन जावे.
संपर्क क्र.-२८८७११०५