जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा 2025-26
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर आयोजित जिल्हा स्तर शालेय कॅरम स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी कॅरम खेळाडुंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहेत आणि जे खेळाडु प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी खालील वेळेप्रमाणे उपस्थित राहतील त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.
1) दिनांक 16/09/2025 -: 17 वर्ष मुले उपस्थिती -: सकाळी 08.30 वाजता
2) दिनांक 17/09/2025 -: 14 वर्ष मुले उपस्थिती सकाळी 8.30 वाजता.
3) दिनांक 18/09/2025 - 14 वर्ष मुली उपस्थिती सकाळी 8.30 वाजता आणि 17 वर्ष मुली उपस्थिती सकाळी 11.30 वाजता.
4) दिनांक 19/09/2025 - 19 वर्ष मुली उपस्थिती सकाळी 08.30 वाजता आणि 19 वर्ष मुले उपस्थिती सकाळी 11.30 वाजता.
स्पर्धा ठिकाण -: सरदार वल्लभभाई पटेल विविधलक्षी विद्यालय, सुभाष लेन, मयूर थिएटर जवळ, कांदिवली पश्चिम मुंबई 400067.
स्पर्धेसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना-: स्पर्धेच्या ठिकाणी शाळा आणि कॉलेज आहे. हया शाळा आणि कॉलेज यांची परिक्षा सुरु असल्यामुळे केवळ खेळाडूंनाच हॉल मध्ये प्रवेश दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत पालकांना, शाळा/ खाजगी कोच, क्रीडा शिक्षक यांना हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. याबाबात शाळेने खेळाडूंना, पालकांना, कोच आणि क्रीडा शिक्षक यांना माहिती द्यावी.
तसेच या ठिकाणी गाडी (दुचाकी आणि चारचाकी) पार्किंसाठी जागा नाही. यास्तव पालक शिक्षकांनी शाळा कॉलेज समोर आणि बाजुला गाडया पार्किंग करु नयेत. तसेच याबाबत कॊणताही वाद आयोजन समिती आणि शाळा व्यवस्थापन यांच्याशी घालु नये अशी विनंती आहे.
स्पर्धा आयोजन समितीचा निर्णय अंतिम असेल याबाबत खेळाडू, पालक, कोच, शिक्षक यांनी कोणताही वाद घालू नये. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा वाद आयोजकाशी घातल्यास संबंधित खेळाडू शाळा यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करून त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात येईल याची स्पषपणे नोंद घ्यावी.
तसेच प्रत्येक स्पर्धेकाने स्वतःचा striker स्पर्धेसाठी घेऊन यावा.
स्पर्धेसाठी येताना खेळाडूंनी त्यांचे प्लेअर आय डी ज्यावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही शिक्का असणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
No comments:
Post a Comment