सन 2018-19 या
वर्षाचे जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याबाबत
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचे आवाहन .
क्रीडा व युवकसेवा
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचेद्वारा दिनांक 12.011.2013
रोजीच्या शासननिर्णयाद्वारे सन 2018-19 या वर्षाच्या जिल्हा युवा
पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्हयातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी
कार्य करणा-या संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील युवांनी व
सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे
कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात
येतात.सन 2018-19 या वर्षाकरिता 1 युवक, 1 युवती आणि 1 संस्था असे एकुण 03 पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
(अ ) युवक/युवती पुरस्कार -
(1)
पुरस्कार
वर्षाच्या 1 एप्रिल रोजी पुरस्कारार्थीचे वय 13 वर्षे पुर्ण असावे, तसेच 31 मार्च
रोजी
वय 35 वर्षाच्या आत असले पाहीजे.
(2) अर्जदार
हा मुंबई उपनगर जिल्हयात सलग 5 वर्ष वास्तव्यास असला पाहीजे.
(3
) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे,
प्रशस्तीपत्रे, चित्रफीती, फोटो इ.जोडावेत.( गत तीन वर्षाच्या 1 जून
ते 31 मे
या कालावधीतील
कार्याबाबतच्या
माहीतीसह सादर करावेत )
(
4 ) केंद्र,राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील
अधिकारी/कर्मचारी
विदयापीठअंतर्गत महाविदयालयातील
प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
(ब) संस्था युवा पुरस्कार -
( 1 ) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था
5 वर्षे कार्यरत पाहीजे.
(2) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किवा मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲकट 1950 नुसार
पंजीबध्द
असावी.
(3) गुणांकनाकरिता
संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीती, फोटो
इ.जोडावेत .
वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी
विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 25 जुन 2019
पर्यंत सुटटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई
उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविदयालय खालील परीसर,संभाजीनगरसमोर,आकुर्ली रोड, कांदिवली
पूर्व,मुंबई - 400101. दुरध्वनी क्र.(022)58871105 येथे सादर करावेत. अधिक
माहीतीसाठी दुरध्वनी क्रमांक
022/28871105/9209314649 यावर संपर्क साधावा
.....