Friday, October 16, 2026

अंधेरी-बोरिवली तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२६-२७ (१४ वर्षांखालील मुले व मुली)

​अंधेरी-बोरिवली तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२६-२७

(१४ वर्षांखालील मुले व मुली)


अंधेरी-बोरिवली तालुकास्तरीय १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या कबड्डी क्रीडा स्पर्धा दिनांक १८ व १९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


📍 स्पर्धेचे ठिकाण :


🔹 बोरिवली तालुका : अभी गोरेगावकर स्कूल, गोरेगाव (पूर्व).


🔹 अंधेरी तालुका : महात्मा गांधी विद्यालय, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व).


तरी सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांनी याची नोंद घ्यावी व आपल्या संघासह स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे.


सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

Thursday, October 15, 2026

जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धा २०२५-२६

 *जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धा २०२५-२६*

📅 *दिनांक : १९ ऑक्टोबर २०२६*

स्थळ - भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल धारावी 
📢 स्पर्धेचे वेळापत्रक व रिपोर्टिंग वेळ

👧 मुलींचे गट
१. १४ वर्षांखालील मुली – दुपारी १:०० वाजता

२. १७ वर्षांखालील मुली – दुपारी २:०० वाजता

३. १९ वर्षांखालील मुली – दुपारी २:३० वाजता

👦 मुलांचे गट
१. १४ वर्षांखालील मुले – दुपारी ३:०० वाजता

२. १७ वर्षांखालील मुले – दुपारी ४:०० वाजता

३. १९ वर्षांखालील मुले – सायंकाळी ५:०० वाजता

📌 सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी वरील वेळापत्रकाची नोंद घ्यावी व दिलेल्या रिपोर्टिंग वेळेनुसार स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे.

अनिवार्य कागदपत्रे :

प्रत्येक संघाने येताना खेळाडूंची Online Player List व Player ID सोबत आणणे अनिवार्य आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धांसाठी अनिवार्य करण्यात आलेली आहेत :

▪️ जन्म दाखला – खेळाडूचे वय ५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी संबंधित शासकीय विभागाकडून वितरित केलेला जन्म दाखला.

▪️ जनरल रजिस्टर उतारा – खेळाडूने प्रथम इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदीची सत्यप्रत.

▪️ आधार कार्ड

⚠️ वरील सर्व कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध ठेवणे अनिवार्य आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्यास संबंधित खेळाडू/संघाच्या सहभागाबाबत नियमानुसार निर्णय घेतला जाईल.

सर्व क्रीडा शिक्षकांनी वरील सूचनांची नोंद घेऊन त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.

जिल्हास्तरीय बॅडमिंटन* स्पर्धेमध्ये विजयी झालेले संघ तसेच निवड चाचणीद्वारे विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे

*जिल्हास्तरीय बॅडमिंटन*  स्पर्धेमध्ये विजयी झालेले संघ तसेच निवड चाचणीद्वारे विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे

सदर यादीतील सर्व पात्र खेळाडू व फक्त विजयी संघांनी विभागस्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित रहावे . उपस्थित राहताना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांनुसार आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे.

सर्व क्रीडा शिक्षक संबंधित खेळाडूंनी याची नोंद घ्यावी व आवश्यक कागदपत्रांसह विभागस्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित राहावे.

— जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर


Wednesday, October 14, 2026

शालेय विभागस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा सन 2026

शालेय विभागस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा सन 2026-27* 

(गट - 14/17/19 वर्ष - मुले व मुली)
*दिनांक 17 ऑक्टोंबर - वयोगट - 14 वर्ष मुले व मुली*
 *दिनांक 18 ऑक्टोबर - वयोगट - 17 वर्ष मुले व मुली* 
 *दिनांक 19 ऑक्टोबर - वयोगट - 19 वर्ष मुले व मुली* 

➡️ स्थळ  : विराज इंटरनॅशनल स्कूल, बोईसर, पालघर 
➡️ रिपोर्टिंग वेळ - सकाळी 8.00 वाजता

➡️ स्पर्धकांची प्रवेशिका (Online Entry) व ओळखपत्र सोबत सादर करावे. 
➡️ प्रवेशिका व ओळपत्राशिवाय कोणालाही खेळवले जाणार नाही. 
➡️ ओळखपत्रावर खेळाडू, क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरी पूर्ण असाव्या

👉 स्पर्धेसाठी इंडोर नॉनमार्किंग सोल असणारे शूज घालून खेळावे. (नसल्यास सॉक्स घालून खेळणे)
👉 स्पर्धेसाठी येताना स्वतःचे फेदर शटल घेऊन येणे.

➡️ सोबत आणावयाची कागदपत्रे -
अ) जन्मदाखला (Birth Certificate) 
ब) संबधीत खेळाडूचे आधार कार्ड
क) खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदीची सत्यप्रत 

 *निवड चाचणी*
 
*दिनांक 17 ऑक्टोंबर - वयोगट - 14 वर्ष मुले व मुली- दुपारी 2 वाजता*
 *दिनांक 18 ऑक्टोबर - वयोगट - 17 वर्ष मुले व मुली - दुपारी 2 वाजता** 
 *दिनांक 19 ऑक्टोबर - वयोगट - 19 वर्ष मुले व मुली -दुपारी 2 वाजता* 

स्पर्धा प्रमुख -  
श्री. गिरीश इरनाक - मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी, पालघर
श्री. अमृत घाडगे, क्रीडा अधिकारी 
श्री. निशांत गवई (9665355118 / 8830208704 )

आपला,
जिल्हा क्रीडा अधिकारी 
पालघर

Tuesday, October 13, 2026

🏏 जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ – निवड चाचणीबाबत महत्त्वाची सूचना 🏏

🏏 जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ – निवड चाचणीबाबत महत्त्वाची सूचना 🏏

सर्व संबंधित खेळाडू, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक यांना सूचित करण्यात येते की, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ करिता खालीलप्रमाणे खेळाडूंची निवड चाचणी आयोजित करण्यात येत आहे.

📅 दिनांक: बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ४.०० वाजता
📍 स्थळ: टाइम्स ऑफ इंडिया क्रीडांगण, आझाद मैदान, मुंबई.

निवड चाचणीचे वयोगटनिहाय वेळापत्रक :

१. १४ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी – बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता.

२. १९ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी – बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता.

सदर निवड चाचणीसाठी पात्र व इच्छुक खेळाडूंनी विहित वेळेत संबंधित क्रीडांगणावर उपस्थित राहून रिपोर्टिंग करावे. सर्व खेळाडूंनी आवश्यक क्रीडा साहित्य व संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

सर्व संबंधितांनी सदर सूचनेची नोंद घेऊन वेळेत उपस्थित राहावे, ही विनंती.

आदेशानुसार,
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
मुंबई उपनगर

Monday, October 12, 2026

🏅 जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏅

🏅 जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏅

आयोजक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर

सर्व संबंधित क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक व शाळा प्रमुख यांना कळविण्यात येते की, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ दिनांक १४  ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.

📍 स्पर्धेचे ठिकाण :  एन.एल. कॉम्प्लेक्स ग्राउंड, आशिष कॉम्प्लेक्स के पास, दहिसार ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र 400068

📅 स्पर्धेचे वेळापत्रक

🔹 दिनांक : १४ ऑक्टोबर २०२६

 वयोगटानुसार रिपोर्टिंग वेळ :
▪️१४ वर्षांखालील मुले व मुली – सकाळी १०.०० वाजता
 ▪️१७ वर्षांखालील मुले व मुली – दुपारी १२.३० वाजता
 ▪️१९ वर्षांखालील मुले व मुली – दुपारी २.oo वाजता


📌 उपस्थितीबाबत महत्त्वाच्या सूचना

सर्व संबंधित क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक यांनी आपल्या संघातील खेळाडूंसह निर्धारित दिनांक व वेळेनुसार स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व खेळाडूंची पात्रता यांची पूर्वतपासणी करून घ्यावी.

📋 स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रे

सर्व सहभागी खेळाडूंनी खालील कागदपत्रे अनिवार्यपणे सोबत आणावीत.

१. खेळाडूंची यादी (Player List)
२. खेळाडूंचे ऑनलाइन ओळखपत्र (Online Identity Card)
३. जन्मतारखेचा अधिकृत दाखला / प्रमाणपत्र
४. शाळेच्या जनरल रजिस्टरमधील जन्मतारखेच्या नोंदीची सत्यप्रत
५. आधार कार्ड
६. शाळेचे ओळखपत्र

⚠️ SSC/HSC व्यतिरिक्त इतर शिक्षण मंडळांच्या शाळांसाठी विशेष सूचना

SSC/HSC व्यतिरिक्त इतर शिक्षण मंडळांशी संलग्न शाळांमधील खेळाडूंनी चालू शैक्षणिक वर्षात संबंधित शिक्षण मंडळामार्फत आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतलेला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्राप्त करून स्पर्धेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

सदर प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित खेळाडूच्या सहभागाबाबत नियमानुसार निर्णय घेण्यात येईल.

📌 सर्व संबंधितांसाठी महत्त्वाच्या सूचना

१. सर्व खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झालेली असल्याची खात्री करावी.

२. खेळाडूंची वयोगटानुसार पात्रता तपासून सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.

३. सर्व खेळाडूंनी निर्धारित दिनांक व वेळेत संपूर्ण कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

४. कागदपत्रांमध्ये त्रुटी, अपूर्णता अथवा पात्रतेबाबत चुकीची माहिती आढळल्यास प्रचलित नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

५. स्पर्धेचे ठिकाण व अन्य आवश्यक सूचना स्वतंत्रपणे कळविण्यात येतील. सर्व संबंधितांनी त्याची नोंद घ्यावी.

☎️ अधिक माहितीसाठी संपर्क

श्री. अभिजीत गुरव
क्रीडा कार्यकारी अधिकारी
📞 ८१०८६१४९११


सर्व संबंधित क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक व शाळा प्रमुख यांनी वरील सूचनांची नोंद घेऊन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

— जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
मुंबई उपनगर

Saturday, October 10, 2026

बोरिवली तालुका खो-खो स्पर्धा

बोरिवली तालुका स्तरीय खो खो स्पर्धा २०२६-२७ 
११ ऑक्टोबर २०२६ रविवार 

१७ वर्षाखालील मुली
ज्ञानेश्वर विद्यालय विरुद्ध आनंद नगर मनपा 
अभि गोरेगावकर 
दहिसर विद्यामंदिर विरुद्ध आत्मोदय विद्यालय 


१७ वर्षाखालील मुले 
उपांत्य फेरीचे सामने 
चिंचोली बंदर विरुद्ध नंदादीप विद्यालय 
अभि गोरेगावकर विरुद्ध दुर्गादेवी सराफ 

*रिपोर्टिंग टाइम : सकाळी ८ वाजता*👆🏻 

१९ वर्षाखालील मुले 
दुर्गादेवी सराफ विरुद्ध गोखले कॉलेज 

*रिपोर्टिंग टाइम : सकाळी १२ वाजता* 👆🏻

स्थळ : नंदादीप विद्यालय गोरेगाव (पूर्व)

(Please bring your college ID card, Player list, dso id card)

सुधारित जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२६

🏸 *जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२६*
*दिनांक: १४ ऑक्टोबर २०२६*
🕒 रिपोर्टिंग वेळ: दुपारी 4:15 वाजता दुपारी 

स्थळ: ठाकूर पब्लिक स्कूल,(सेकंडरी बिल्डिंग 1st floor , डी-मार्टजवळ, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई.

स्पर्धेचे वेळापत्रक : 

१. जिल्हास्तरीय *१४ वर्षाखालील मुले व मुली*- 
 ( जे संघ तालुकास्तरावर विजयी व उपविजेयी झालेले आहेत असे संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र आहेत)


२. *१७ वर्षाखालील मुली* – जिल्हास्तरीय (3 rd place मॅच)
जिल्हास्तरीय स्पर्धेतील  (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ ३ऱ्या स्थानासाठीचा सामना खेळतील.
(पेस जूनियर सायन्स कॉलेज अंधेरी वेस्ट v/s  उदयांचल हायस्कूल)

३. *१९ वर्षाखालील मुली* – जिल्हास्तरीय (3 rd place)
➡️ जिल्हास्तरीय स्पर्धेतील  (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ ३ऱ्या स्थानासाठीचा सामना खेळतील.
(प्रह्लादराय डालमिया कॉलेज v/s  एस के सोमय्या विनयमंदिर)

४. *१७ वर्षांखालील - मुले* 
 तृतीय स्थानासाठीचा सामना (Third Place Match).
- जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ तृतीय स्थानासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील.
( श्री श्री रविशंकर विद्यामंदिर v/s द सोमय्या स्कूल)

५. *१९ वर्षांखालील मुले* 
तृतीय स्थानासाठीचा सामना (Third Place Match)
- जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ तृतीय स्थानासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील.
(के जे सोमय्या सायन्स अँड कॉमर्स v/s दी बी एस जी डी जूनियर कॉलेज )

*19 वर्ष मुले side selection* 
- Om wagh (k j somayya sci n com)
- piyam solanks ( the B S G D )
- om dabelar ( mithibai school)
- Meet thakur ( thakur ramnarayan collage)

सर्व संबंधित संघांनी व क्रीडा शिक्षकांनी वरील सूचनेची नोंद घ्यावी व दिलेल्या वेळेनुसार स्पर्धास्थळी उपस्थित राहावे.

District Mallakhamb 2026-27

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर 
जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा २०२६-२८
- दिनांक - ११ ऑक्टोबर २०२६
- स्थळ:- पटूक टेक्नीकल हायस्कूल, पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग, वाकोला, सांताक्रूझ पूर्व, मुंबई – 400055 
- वयोगटानुसार वेळापत्रक खालीलप्रमाणे 
- १९ वर्षांखालील मुले -मुली:- सकाळी ८ ते सकाळी १०:३० पर्यंत 
- १७ वर्षांखालील मुले -मुली :- सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत 
- दुपारी २ ते ३ ब्रेक 
- १४ वर्षांखालील मुले -मुली :- दुपारी ३ ते रात्री८ पर्यंत 
- आवश्यक कागदपत्रे - (१. प्लेअर आयडी
२.आधार कार्ड 
३. जन्मदाखला
४. पहिली इयत्तेचे स्कूल रजिस्टर सत्यप्रत)
- स्पर्धा राज्य आणि राष्ट्रीय संघटनेच्या नियमानुसार होतील याची नोंद घ्यावी.
( सूचना - खेळाडूंनी आपापल्या वयोगटाच्या दिलेल्या वेळेच्या ३० मी. आधी स्पर्धा ठिकाणी उपस्थित राहावे )

- स्पर्धा प्रमुख - आशिष देवल. (९६६४००२०५१)
- क्रीडा अधिकारी - मानसी गावडे.( ७०२०३०४२६८)

Update schedule for borivali taluka volleyball

बोरिवली तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026*

दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या 14 वर्षाखालील मुले यांच्या उर्वरित स्पर्धा *दिनांक 11 ऑक्टोबर 2026* (रविवार) रोजी होणार आहेत.

14 वर्षाखालील मुले (उर्वरित स्पर्धा)
दिनांक - 11ऑक्टोबर 2026 
रिपोर्टिंग टाईम - 7: 45 am 
 
14 वर्षाखालील मुली (finals)
Reporting time - 10 am

17 वर्षाखालील मुली (finals)
Reporting time - 10 am 

17 वर्षाखालील मुले 
Pool B 
Reporting time - 10 :30 am 

Venue - टी. एस बाफना कॉलेज ,मालाड पश्चिम ( एस. एन डी. टी)

Friday, October 9, 2026

बोरिवली तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026*

*बोरिवली तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026*

दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या 14 वर्षाखालील मुले यांच्या उर्वरित स्पर्धा *दिनांक 11 ऑक्टोबर 2026* (रविवार) रोजी होणार आहेत.

14 वर्षाखालील मुले (उर्वरित स्पर्धा)
दिनांक - 11ऑक्टोबर 2026 
रिपोर्टिंग टाईम - 7: 45 am 
 
14 वर्षाखालील मुली (finals)
Reporting time - 10 am

17 वर्षाखालील मुले 
Pool B 
Reporting time - 10 am 

Venue - टी. एस बाफना कॉलेज ,मालाड पश्चिम ( एस. एन डी. टी)

district Langdi Competition 2026-27

*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर* व 
*लंगडी असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर*
यांच्या संयुक्त विद्यमाने 
*जिल्हास्तरीय शालेय लंगडी स्पर्धा २०२६-२०२७*
• वयोगट: १९ वर्षे - मुले/मुली
• दिनांक: १०/१०/२०२६
• अर्ज सादर करण्याची वेळ: ९.०० ते ९.३० वाजता
• स्पर्धेस प्रारंभ: १०.०० वाजता
• ठिकाण: गांधी मैदान कुर्ला, हनुमान मंदिरा जवळ, कुर्ला बस स्थानक ३१० च्या स्टॉप समोर, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०००७०.

✓ *कागदपत्र विषयी सूचना*:-
• सर्व शिक्षकांना सुचित करण्यात येते की, ओरिजनल प्रायमरी एन्ट्री तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले ओरिजनल ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या ओळखपत्रावरती मुख्याध्यापक यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे. 
• १ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य.
• जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही.

✓ *सर्व शिक्षकांना स्पर्धेची सूचना*:-
१) संघाने पूर्ण तयारीनिशी वेळेत हजर राहणे गरजेचे आहे. तयारीसाठी वेगळा वेळ दिला जाणार नाही.  
२) संघाचा गणवेश असने गरजेचे आहे. प्रत्येक खेळाडूच्या टी-शर्ट वरती नंबर असणे गरजेचे आहे. त्याशिवाय संघाला स्पर्धा खेळण्यास परवानगी मिळणार नाही.
३) स्पर्धेच्या वेळी खाजगी क्रीडा शिक्षकांना खेळाच्या ठिकाणी प्रवेश असणार नाही. 
४) पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. खेळाडूंनी किंवा क्रीडा शिक्षकांनी दंगा किंवा खेळात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास खेळाडूला बाद करण्यात येईल.
५) कोणत्याही परिस्थितीमध्ये कलर झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही. 


• प्रमुख मार्गदर्शक : श्री. योगेश कुडतरकर (अध्यक्ष, लंगडी असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर)

• स्पर्धा संयोजक : श्री. अविनाश महाडिक (स्पर्धा समिती प्रमुख, लंगडी असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर)

• विशेष सहकार्य : हनुमान क्रीडा मंडळ, कुर्ला • गौरीशंकर क्रीडा मंडळ, कुर्ला • अविनाश स्पोर्ट्स अकॅडमी, कुर्ला 

• अधिक माहितीसाठी संपर्क :-
• मानसी गावडे (क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर) - 7020304268
• जितेश लोटणकर (तांत्रिक समिती प्रमुख, लंगडी असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर) - 8424860021