*जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धा २०२५-२६*
📅 *दिनांक : १९ ऑक्टोबर २०२६*
स्थळ - भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल धारावी
📢 स्पर्धेचे वेळापत्रक व रिपोर्टिंग वेळ
👧 मुलींचे गट
१. १४ वर्षांखालील मुली – दुपारी १:०० वाजता
२. १७ वर्षांखालील मुली – दुपारी २:०० वाजता
३. १९ वर्षांखालील मुली – दुपारी २:३० वाजता
👦 मुलांचे गट
१. १४ वर्षांखालील मुले – दुपारी ३:०० वाजता
२. १७ वर्षांखालील मुले – दुपारी ४:०० वाजता
३. १९ वर्षांखालील मुले – सायंकाळी ५:०० वाजता
📌 सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी वरील वेळापत्रकाची नोंद घ्यावी व दिलेल्या रिपोर्टिंग वेळेनुसार स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे.
अनिवार्य कागदपत्रे :
प्रत्येक संघाने येताना खेळाडूंची Online Player List व Player ID सोबत आणणे अनिवार्य आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धांसाठी अनिवार्य करण्यात आलेली आहेत :
▪️ जन्म दाखला – खेळाडूचे वय ५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी संबंधित शासकीय विभागाकडून वितरित केलेला जन्म दाखला.
▪️ जनरल रजिस्टर उतारा – खेळाडूने प्रथम इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदीची सत्यप्रत.
▪️ आधार कार्ड
⚠️ वरील सर्व कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध ठेवणे अनिवार्य आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्यास संबंधित खेळाडू/संघाच्या सहभागाबाबत नियमानुसार निर्णय घेतला जाईल.
सर्व क्रीडा शिक्षकांनी वरील सूचनांची नोंद घेऊन त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.
No comments:
Post a Comment