*जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा २०२६–२७*🎾
वयोगट: १९ वर्षाखालील मुले व मुली
दिनांक: ०६ ऑक्टोबर २०२६
रिपोर्टिंग वेळ: सकाळी ०८:०० वाजता
स्थळ: BKHMT कॅम्पस, हंसराज मोरारजी शाळा मैदान, भवन कॉलेजजवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई
📌 सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी खालील सूचनांची नोंद घ्यावी:
१. शिस्त व स्वच्छता
सर्व खेळाडूंनी शिस्तीचे पालन करावे. शाळेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा गैरवर्तन करू नये तसेच परिसर स्वच्छ ठेवून कचराकुंडीचा वापर करावा.
२. आवश्यक कागदपत्रे
सर्व खेळाडूंनी खालील कागदपत्रे अनिवार्यपणे सोबत आणावीत:
ऑनलाइन ओळखपत्र (Online ID)
मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह टीम लिस्ट
जन्म प्रमाणपत्राची प्रत (जन्मानंतर ५ वर्षांच्या आतील नोंद असलेली)
आधार कार्डची प्रत
इयत्ता पहिलीत प्रवेश घेतानाच्या General Register (GR) क्रमांकाची सत्यप्रत
३. प्रवेशाबाबत सूचना
खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणालाही स्पर्धास्थळी प्रवेश दिला जाणार नाही.
शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित नसतील आणि प्रशिक्षक खेळाडूंसोबत येत असतील, तर संबंधित शाळेचे अधिकृत पत्र अनिवार्य आहे.
४. दिलेल्या रिपोर्टिंग वेळेनंतर ३० मिनिटांपेक्षा अधिक उशिरा उपस्थित राहणाऱ्या खेळाडूस स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार नाही व त्याला/तिला स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
५. सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये. वरील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्पर्धेचे नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.
6.
📞 संपर्क
क्रीडा अधिकारी – रुचा मॅडम: ७६६६४६७४३०
डॉ. त्रिभुवन सिंग: ९८२१३९९९३१
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment