Monday, October 12, 2026

🏅 जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏅

🏅 जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏅

आयोजक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर

सर्व संबंधित क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक व शाळा प्रमुख यांना कळविण्यात येते की, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ दिनांक १४  ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.

📍 स्पर्धेचे ठिकाण :  एन.एल. कॉम्प्लेक्स ग्राउंड, आशिष कॉम्प्लेक्स के पास, दहिसार ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र 400068

📅 स्पर्धेचे वेळापत्रक

🔹 दिनांक : १४ ऑक्टोबर २०२६

 वयोगटानुसार रिपोर्टिंग वेळ :
▪️१४ वर्षांखालील मुले व मुली – सकाळी १०.०० वाजता
 ▪️१७ वर्षांखालील मुले व मुली – दुपारी १२.३० वाजता
 ▪️१९ वर्षांखालील मुले व मुली – दुपारी २.oo वाजता


📌 उपस्थितीबाबत महत्त्वाच्या सूचना

सर्व संबंधित क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक यांनी आपल्या संघातील खेळाडूंसह निर्धारित दिनांक व वेळेनुसार स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व खेळाडूंची पात्रता यांची पूर्वतपासणी करून घ्यावी.

📋 स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रे

सर्व सहभागी खेळाडूंनी खालील कागदपत्रे अनिवार्यपणे सोबत आणावीत.

१. खेळाडूंची यादी (Player List)
२. खेळाडूंचे ऑनलाइन ओळखपत्र (Online Identity Card)
३. जन्मतारखेचा अधिकृत दाखला / प्रमाणपत्र
४. शाळेच्या जनरल रजिस्टरमधील जन्मतारखेच्या नोंदीची सत्यप्रत
५. आधार कार्ड
६. शाळेचे ओळखपत्र

⚠️ SSC/HSC व्यतिरिक्त इतर शिक्षण मंडळांच्या शाळांसाठी विशेष सूचना

SSC/HSC व्यतिरिक्त इतर शिक्षण मंडळांशी संलग्न शाळांमधील खेळाडूंनी चालू शैक्षणिक वर्षात संबंधित शिक्षण मंडळामार्फत आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतलेला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्राप्त करून स्पर्धेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

सदर प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित खेळाडूच्या सहभागाबाबत नियमानुसार निर्णय घेण्यात येईल.

📌 सर्व संबंधितांसाठी महत्त्वाच्या सूचना

१. सर्व खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झालेली असल्याची खात्री करावी.

२. खेळाडूंची वयोगटानुसार पात्रता तपासून सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.

३. सर्व खेळाडूंनी निर्धारित दिनांक व वेळेत संपूर्ण कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

४. कागदपत्रांमध्ये त्रुटी, अपूर्णता अथवा पात्रतेबाबत चुकीची माहिती आढळल्यास प्रचलित नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

५. स्पर्धेचे ठिकाण व अन्य आवश्यक सूचना स्वतंत्रपणे कळविण्यात येतील. सर्व संबंधितांनी त्याची नोंद घ्यावी.

☎️ अधिक माहितीसाठी संपर्क

श्री. अभिजीत गुरव
क्रीडा कार्यकारी अधिकारी
📞 ८१०८६१४९११


सर्व संबंधित क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक व शाळा प्रमुख यांनी वरील सूचनांची नोंद घेऊन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

— जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
मुंबई उपनगर

No comments:

Post a Comment