*लंगडी असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर*
यांच्या संयुक्त विद्यमाने
*जिल्हास्तरीय शालेय लंगडी स्पर्धा २०२६-२०२७*
• वयोगट: १९ वर्षे - मुले/मुली
• दिनांक: १०/१०/२०२६
• अर्ज सादर करण्याची वेळ: ९.०० ते ९.३० वाजता
• स्पर्धेस प्रारंभ: १०.०० वाजता
• ठिकाण: गांधी मैदान कुर्ला, हनुमान मंदिरा जवळ, कुर्ला बस स्थानक ३१० च्या स्टॉप समोर, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०००७०.
✓ *कागदपत्र विषयी सूचना*:-
• सर्व शिक्षकांना सुचित करण्यात येते की, ओरिजनल प्रायमरी एन्ट्री तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले ओरिजनल ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या ओळखपत्रावरती मुख्याध्यापक यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
• १ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य.
• जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही.
✓ *सर्व शिक्षकांना स्पर्धेची सूचना*:-
१) संघाने पूर्ण तयारीनिशी वेळेत हजर राहणे गरजेचे आहे. तयारीसाठी वेगळा वेळ दिला जाणार नाही.
२) संघाचा गणवेश असने गरजेचे आहे. प्रत्येक खेळाडूच्या टी-शर्ट वरती नंबर असणे गरजेचे आहे. त्याशिवाय संघाला स्पर्धा खेळण्यास परवानगी मिळणार नाही.
३) स्पर्धेच्या वेळी खाजगी क्रीडा शिक्षकांना खेळाच्या ठिकाणी प्रवेश असणार नाही.
४) पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. खेळाडूंनी किंवा क्रीडा शिक्षकांनी दंगा किंवा खेळात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास खेळाडूला बाद करण्यात येईल.
५) कोणत्याही परिस्थितीमध्ये कलर झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
• प्रमुख मार्गदर्शक : श्री. योगेश कुडतरकर (अध्यक्ष, लंगडी असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर)
• स्पर्धा संयोजक : श्री. अविनाश महाडिक (स्पर्धा समिती प्रमुख, लंगडी असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर)
• विशेष सहकार्य : हनुमान क्रीडा मंडळ, कुर्ला • गौरीशंकर क्रीडा मंडळ, कुर्ला • अविनाश स्पोर्ट्स अकॅडमी, कुर्ला
• अधिक माहितीसाठी संपर्क :-
• मानसी गावडे (क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर) - 7020304268
• जितेश लोटणकर (तांत्रिक समिती प्रमुख, लंगडी असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर) - 8424860021
No comments:
Post a Comment