Tuesday, December 29, 2020
मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2020-21 अंतिम निकाल-
Saturday, December 26, 2020
युवा महोत्सव २०२०-२१ वेळा पत्रक
Wednesday, December 23, 2020
युवा महोत्सव २०२०-२१
Saturday, December 19, 2020
Monday, December 14, 2020
Scholarship 2019-20 Pending List
Friday, December 11, 2020
व्यायामशाळा विकास अनुदान आणि क्रीडांगण विकास अनुदान- मागणी पत्र २०२०-२१
महाराष्ट्र
शासन
जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय,
मुंबईउपनगर
शासकीय शारीरिक शिक्षण महाविदयालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड,
कांदिवली (पुर्व), मुंबई ४००१०१
E MAIL dsomumbaisub@gmail.com
दुरध्वनी क्र. २८८७११०५
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्र.जिक्रीअमुंउ/व्यायामशाळा/२०२०/
१३९३
दिनांक – ११/१२/२०२०
प्रति,
मुख्याध्यापक / प्राचार्य,
...........................................................
...........................................................
विषय -: व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास अनुदान योजना २०२०-२१.
संदर्भ -: १)
व्यायामशाळा विकास अनुदान योजना शासन निर्णय दि. ०८/०१/२०१९.
२)
क्रीडांगण विकास अनुदान योजना शासन निर्णय दि. ०७/०९/२०१९
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास अनुदान
योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी
यांच्याकडुन अनुदान देण्यात येते. सन २०२०-२१ या वर्षाकरिता खालील अटी व शर्तीं
नुसार अनुदान अर्ज मागविण्यात येत आहेत.
(१) योजनेचे नाव -: व्यायामशाळा विकास अनुदान योजना.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. क्रीडाधो-
संकीर्ण/ प्र.क्र.- ४९/ क्रीयुसे १ दिनांक ८ जानेवारी २०१९, मंत्रालय, मुंबई ४०००२
कार्यान्वयीन यंत्रणा -: जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर.
अनुदान मर्यादा -: रुपये ७.०० लाख
अनुदानाच्या बाबी -: १) स्वतंत्र व्यायामगृहाचे बांधकाम करणे, २) अत्याधुनिक व्यायामसाहित्य खरेदी
करणे, ३) व्यायामशाळा दुरुस्ती करणे अथवा नुतनीकरण करणे, ४) खुली व्यायामशाळा (open gym) उभारणे.
अनुदान मंजुरीसाठी पात्रतेचे निकष
आणि अटी व शर्ती -:
अनुदानासाठी पात्र संस्था -: शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य
संस्था (ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद,
कॅन्टोनमेंट बोर्ड), शासकीय रुग्णालये, शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था.
शालेय
शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या शाळा – महाविदयालये,
तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभाग
चालविण्यात येणारी सर्व शासकीय, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व
वसतीगृह, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय औदयोगिक
प्रशिक्षण संस्था, शासकीय वैदयकीय
महाविदयालय तसेच शासनाद्वारे
मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व
महाविदयालय यांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होऊन पाच वर्ष पुर्ण
झालेली आहेत असे शाळा व महाविदयालये अनुदानासाठी पात्र राहतील.
क्रीडा
विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी / पोलीस विभाग, शासकीय
कार्यालये, जिमखाना हे अनुदानासाठी पात्र ठरतील.
अटी व शर्ती -:
१) अर्जदार संस्थेकडे स्वत:च्या
मालकीची अथवा दीर्घ मुदतीच्या करारावर (किमान ३० वर्ष किंवा त्या पेक्षा अधिक)
जागा असणे आवश्यक आहे.
२) ग्रामपंचायत, नगरपरिषद,
महानगरपालिका, जिल्हा परिषद, शासनाच्या विविध विभागामार्फत दाखल करण्यात येणा-या
प्रस्तावासोबत अंदाजपत्रक, आराखडे, जागेच्या मालकीची कागदपत्रे व इतर हमीपत्र सादर
करणे आवश्यक आहे.
३) बांधकामास ग्रामपंचायत,
नगरपरिषद, महानगरपालिका यांची परवानगी असल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच संबंधित
बाबींचे अंदाजपत्रक व आराखडे नोंदणीकृत अभियंता / नोंदणीकृत वास्तुशिल्पतज्ञ
(आर्किटेक्ट) यांनी मान्य केलेले असावे.
अनुदानासाठी अर्ज करण्याची पध्दत
-:
अनुदान मंजुरीसाठी विहीत
नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे
सादर करावा.
(२) योजनेचे नाव -: क्रीडांगण विकास अनुदान योजना.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.
क्रीडाधो-३११३ संकीर्ण/ प्र.क्र.- ४८/ क्रीयुसे १ दिनांक ७ सप्टेंबर २०१९,
मंत्रालय, मुंबई ४०००२
कार्यान्वयीन यंत्रणा -: जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर.
अनुदान मर्यादा -: रुपये ७.०० लाख आणि क्रीडा साहित्यासाठी
रु. ३.०० लाख
अनुदानाच्या बाबी -: १) क्रीडांगण समपातळीत तयार करणे, २) २०० मी. अथवा ४०० मी. धावनपथ
(रनिंगट्रॅक) तयार करणे, ३) क्रीडांगणास भिंतीचे / तारेचे कुंपन घालणे, ४) विविध
खेळाची एक किंवा अनेक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, ५) प्रसाधनगृह / चेजिंग रुम
बांधणे, ६) पिण्यासाठी व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण
करणे, ७) क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे ८) क्रीडांगणावर फ्लड
लाईटची सुविधा निर्माण करणे, ९) क्रीडा साहित्य खरेदी करणे, १०) क्रीडांगणावर
मातीचा अथवा सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी / आसनव्यवस्था तयार करणे, ११)
प्रेक्षक गॅलरीवर / आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, १२) क्रीडांगणाभोवती ड्रेनेजची
व्यवस्था करणे, १३) मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व
मैदानावर रोलिंग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे.
अनुदान मंजुरीसाठी पात्रतेचे निकष
आणि अटी व शर्ती -:
अनुदानासाठी पात्र संस्था -: शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य
संस्था (ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद,
कॅन्टोनमेंट बोर्ड), शासकीय रुग्णालये, शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था.
शालेय
शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या शाळा –
महाविदयालये, तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभाग,
अल्पसंख्यांक विभाग चालविण्यात येणारी सर्व शासकीय, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा,
आश्रमशाळा व वसतीगृह, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय
औदयोगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैदयकीय
महाविदयालय तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविदयालय यांना शासनामार्फत
अनुदान मिळण्यास प्रारंभ होऊन पाच वर्ष पुर्ण झालेली आहेत असे शाळा व महाविदयालये
अनुदानासाठी पात्र राहतील.
क्रीडा
विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी / पोलीस विभाग, शासकीय
कार्यालये, जिमखाना हे अनुदानासाठी पात्र ठरतील.
अटी व शर्ती -:
१) अर्जदार संस्थेकडे स्वत:च्या
मालकीची अथवा दीर्घ मुदतीच्या करारावर (किमान ३० वर्ष किंवा त्या पेक्षा अधिक)
जागा असणे आवश्यक आहे.
२) ग्रामपंचायत, नगरपरिषद,
महानगरपालिका, जिल्हा परिषद, शासनाच्या विविध विभागामार्फत दाखल करण्यात येणा-या
प्रस्तावासोबत अंदाजपत्रक, आराखडे, जागेच्या मालकीची कागदपत्रे व इतर हमीपत्र सादर
करणे आवश्यक आहे.
३) बांधकामास ग्रामपंचायत,
नगरपरिषद, महानगरपालिका यांची परवानगी असल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच संबंधित
बाबींचे अंदाजपत्रक व आराखडे नोंदणीकृत अभियंता / नोंदणीकृत वास्तुशिल्पतज्ञ
(आर्किटेक्ट) यांनी मान्य केलेले असावे.
अनुदानासाठी अर्ज करण्याची पध्दत
-:
अनुदान मंजुरीसाठी विहीत
नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाकडे सादर करावा.
वरील
अटी व शर्तींची पुर्तता करण्या-या शाळा, महाविदयालय, स्थानिक स्वराज्य संस्था,
औदयोगिक प्रशिक्षण संस्था इ. नी विहीत नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक त्या
कागदपत्रांसह अर्ज दिनांक २४/१२/२०२० पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात
सादर करावेत.
(सुवर्णा बारटक्के)
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर
Wednesday, December 9, 2020
जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१९-२० साठी अर्ज पाठविणेबाबत -: DISTRICT SPORTS AWARDS 2019-20
जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्हा
क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचे आवाहान.
क्रीडा व
युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांचेद्वारा दिनांक २४/०१/२०२० रोजीच्या
शासन निर्णयाद्वारे सन २०१९-२० या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्हयातील
गुणवंत क्रीडापटू
(पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडु) आणि
क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील गुणवंत
क्रीडापटू,
क्रीडा मार्गर्शक यांच्या
कार्याचे / योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन
मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०१९-२० या वर्षाकरिता
गुणवंत क्रीडापटू
(पुरुष, महिला व दिव्यांग
खेळाडु) आणि क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
(अ) क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
-:
(१)
पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्हयामध्ये वास्तव्य असावे. (२)
वयाची ३५ वर्ष पुर्ण केलेली असावीत. (३)
सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्हयातील कामगिरी ग्राहय धरली जाईल. (४)
गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक
विजेते तसेच कनिष्ठ शालेय,
ग्रामीण व महिला (खेलो इंडिया)
मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडु तयार केले असतील
असा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.
(ब) खेळाडु पुरस्कार -: (१)
खेळाडुने पुरस्कार वर्षासह लगत पुर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या
जिल्हयाचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. (२)
खेळाडुंची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य / राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षालगतपुर्व पाच
वर्षातील राज्य व राष्ट्रीयस्तरावरील वरीष्ठ /कनिष्ठ शालेय,
राष्ट्रीय शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील
राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी आणि यापैकी उत्कृष्ठ तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात
येईल.
वरील प्रमाणे
पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक ३० डिसेंबर २०२० पर्यंत
सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविदयालय परिसर, संभाजीनगर समोर,
आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व) मुंबई ४००१०१ येथे सादर करावेत.
अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२२/ २८८७११०५ यावर संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी कळवले आहे.
(सुवर्णा बारटक्के)
जिल्हा
क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर
जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी खालील खेळांचा विचार केला
जाईल.
अ.क्र. |
खेळाचे नाव |
अ.क्र. |
खेळाचे नाव
|
१ |
धनुर्विदया {आर्चरी} |
२३ |
मुष्ठीयुध्द {बॉक्सींग} |
२ |
मैदानी क्रीडा स्पर्धा {अँथलेटिक्स} |
२४ |
क्रिकेट |
३ |
बॅडमिंटन |
२५ |
फूटबॉल |
४ |
बिलियर्डस अँड स्नुकर |
२६ |
हँडबॉल |
५ |
कॅरम |
२७ |
हॉकी |
६ |
बुध्दीबळ (चेस) |
२८ |
ज्युदो |
७ |
सायकलिंग |
२९ |
कबड्डी |
८ |
तलवारबाजी {फेन्सिंग} |
३० |
कनोईंग / कयाकिंग |
९ |
गोल्फ |
३१ |
खो खो |
१० |
जिम्नॅस्टिक |
३२ |
भारोत्तोलन {पॉवरलिफ्टींग} |
११ |
अश्वारोहन {हॉर्स रायडिंग} |
३३ |
रोईंग |
१२ |
लॉन टेनिस |
३४ |
तायक्वांदो |
१३ |
मल्लखांब |
३५ |
व्हॉलीबॉल |
१४ |
नेमबाजी {शुटींग} |
३६ |
वजन उचलणे {वेटलिफ्टींग} |
१५ |
स्केटिंग |
३७ |
कुस्ती {रेसलिंग} |
१६ |
स्क्वॅश |
३८ |
वुशू |
१७ |
जलतरण {स्विमिंग} [डायव्हिंग, वॉटरपोलो] |
३९ |
यॉटींग |
१८ |
टेबल टेनिस |
४० |
सॉफ्टबॉल |
१९ |
ट्रायथलॉन |
४१ |
रग्बी |
२० |
आटयापाटया |
४२ |
मॉडर्न पेंटॉथलॉन |
२१ |
बास्केटबॉल |
४३ |
बेसबॉल |
२२ |
शरीरसौष्ठव {बॉडीबिल्डींग} |
४४ |
स्पोर्ट क्लाइंबिंग |