Tuesday, July 13, 2021

केंद्र शासनाच्या आयकर विभागाची खेळाडु भरती २०२१- अत्यंत महत्त्वाचे.

          केंद्र शासनाच्या आयकर विभागाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडुंकरिता विविध पदांच्या खेळाडु भरतीचा कार्यक्रम आयकर विभागामार्फत दि. ०८/०७/२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर जाहिरात आणि त्यासंबंधीत इतर माहिती www.incometaxmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

          या जाहिरातीमधील परिच्छेद २ मध्ये पात्र खेळ प्रकार नमुद केले असुन परिच्छेद ३ मधील मुद्दा क्र. ३ अन्वये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडु पात्र ठरणार आहेत. या जाहिरातीमधील परिच्छेद ४ आणि ५ मधील मुद्दा क्र. ४ अन्वये संबंधीत खेळाडूंनी शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे.

        त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्हयातील खेळाडुंना / संघटनांना / पालकांना कळविण्यात येते की, जाहिरीतीमधील पात्रता निर्देशानुसार केवळ भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडुंनी  सदर प्रमाणपत्र प्रमाणित करुन घेण्यासाठी राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, बालेवाडी, पुणे येथे न जाता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शारीरिक शिक्षण महाविदयालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व मुंबई ४००१०१ येथे सकाळी ११.०० ते ३.०० या वेळेतच (सुट्टीचे दिवस वगळुन) आपला अर्ज ज्यावर आपले संपुर्ण नाव, पत्ता, ई मेल आणि मोबाईल क्रमांक इ माहिती आणि शालेय राष्ट्रीय स्पर्धेच्या मुळ प्रमाणपत्र आणि झेरॉक्स प्रतीसह अर्ज जमा करावा. सदर अर्जावर संचालनालयाकडुन पडताळणी होऊन स्वाक्षरी आणि शिक्का होऊन ते संबंधितांच्या ई मेल आयडी संचालनालयामार्फत पाठ्विण्यात येणार आहेत. यास्तव इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथे जमा करावेत. उशिराने प्राप्त झालेल्या अर्जवार विहीत मुदतीत संचालनालयाकडुन कार्यवाही न झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसेच जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या खेळांच्याच खेळाडुंनी आणि केवळ भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडुंनी या कार्यालयाकडे विहीत मुदतीत अर्ज करावेत.