PLEASE SEE THE ALL AGR GROUP DRAWS OF JAWAHRLAL NEHRU DISTRICT HOCKEY TOURNAMENT 2022-23.
Monday, August 8, 2022
JAWAHARLAL NEHRU HOCKEY 2022-23 -: DRAWS
Wednesday, August 3, 2022
ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी स्पर्धा २०२२
ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी स्पर्धा
२०२२ या स्पर्धेची प्रवेशिका विहीत नमुन्यात dsomumbaisub2020@gmail.com या मेल वर दि. ०८/०८/२०२२ दुपारी ०१.००
पर्यंत पाठवाव्यात. तसेच हार्ड कॉपी व
प्रवेश फी रु.
४००/- प्रति संघ खालील दिलेल्या माहीतीच्या आधारे बँक खात्यामध्ये जमा
करुन त्याची काउंटर स्लीप किंवा Transection number (मोबाईल मधुन Transection केल्यास screen shot काढुन त्याची प्रत) प्रवेशिकेसोबत या कार्यालयात जमा
करावी .
Bank name -: Axis Bank
Account Name -: Zilha krida parishad, Mumbai Upnagar
Account number -: 917020041203249
IFS code -: UTIB0000572
Tuesday, August 2, 2022
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविणेबाबत.
Monday, August 1, 2022
DISTRICT SPORTS AWARD-: APPLICATION FOR OF PLAYER (MALE/FEMALE/HANDICAP PLAYER FORM)
DISTRICT SPORTS AWARD 2021-22 -: APPLICATION FORM OF COACH
DISTRICT SPORTS AWARD 2021-22
जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्हा
क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचे आवाहान.
क्रीडा व
युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांचेद्वारा दिनांक २४/०१/२०२० रोजीच्या
शासन निर्णयाद्वारे सन २०२१ - २२ या वर्षाच्या
जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्हयातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडु) आणि
क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील गुणवंत
क्रीडापटू,
क्रीडा मार्गर्शक यांच्या
कार्याचे / योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन
मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२१-२२ या वर्षाकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग
खेळाडु) आणि क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
(अ) क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
-:
(१)
पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्हयामध्ये वास्तव्य असावे. (२)
वयाची ३५ वर्ष पुर्ण केलेली असावीत. (३)
सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्हयातील कामगिरी ग्राहय धरली जाईल. (४)
गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक
विजेते तसेच कनिष्ठ शालेय,
ग्रामीण व महिला (खेलो इंडिया)
मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडु तयार केले असतील
असा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.
(ब) खेळाडु पुरस्कार -: (१)
खेळाडुने पुरस्कार वर्षासह लगत पुर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या
जिल्हयाचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. (२)
खेळाडुंची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य / राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षालगतपुर्व पाच
वर्षातील राज्य व राष्ट्रीयस्तरावरील वरीष्ठ /कनिष्ठ शालेय,
राष्ट्रीय शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील
राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी आणि यापैकी उत्कृष्ठ तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात
येईल.
वरील प्रमाणे
पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत
सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविदयालय परिसर, संभाजीनगर समोर,
आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व) मुंबई ४००१०१ येथे सादर करावेत.
अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२२/ २८८७११०५ यावर संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी कळवले आहे.