Monday, January 8, 2018

क्रीडा गुण सवलत

क्रीडा गुण सवलत

     इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परीक्षेस बसलेल्या व मान्यताप्राप्त राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना यापूर्वी अंतिम परीक्षेस नापास झाल्यास सवलतीचे २५ गुण फक्त उत्तीर्ण होण्याकरिता देण्यात येत होते.
    तथापी शासनाने दि.२१ एप्रिल २०१५ च्या सुधारित शासन निर्णयानुसार फक्त अनुतीर्ण खेळाडूंनादेण्यात येणारी सवलत गुणाची तरतूद बंद करून इयत्ता १० १२ च्या परीक्षेस बसलेल्या खेळाडूंना खालीलप्रमाणे सुधारित सवलत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

१)क्रीडा विभागाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धा प्राविण्य -२५ गुण
२) क्रीडा विभागाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धा सहभाग व राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य-२०
३) क्रीडा विभागाद्वारा आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा सहभाग -१५ गुण
४)अधिकृत संघटनेच्या आंतरराष्ट्रीय सहभाग व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य -२० गुण
५) अधिकृत संघटनेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व राज्य स्पर्धेत प्राविण्य-२०गुण
६) अधिकृत संघटनेच्या राज्य स्पर्धेत सहभाग-१५ गुण

No comments:

Post a Comment