Friday, July 19, 2019

केंद्रीय विद्यालय खेळाडू चाचणीद्वारे प्रवेश प्रक्रिया

केंद्रीय विद्यालय,दिल्ली येथे खेळाडू यांची खेलो इंडीया अंतर्गत खेळाबद्दल संभाव्य प्रतिभा
  प्रवेश चाचणी  व खेळनिहाय कौशल्य चाचणी 
भारतीय खेळ प्राधिकरण व खेलो इंडिया,युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय,केंद्र शासन अंतर्गत खेळाडूंचे खेळातील संभाव्य प्रतिभा कौशल्य व खेळनिहाय कौशल्य यांची शास्त्रोक्त पद्धतीने चाचणी व्दारे निवड करून केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील विविध ठिकाणच्या केंद्रीय विद्यालयामध्ये  सन २०१९-२० या वर्षा करिता मोफत  प्रवेश देण्याचे निश्चित केलेले आहे.
तरी राज्यस्तरावर,राष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू तसेच सर्वसाधारण खेळाडू ज्यांच्यामध्ये खेळाबद्दल उपजत गुण आहेत व जे पुढीलप्रमाणे निवडीचे निकष  पूर्ण करत आहेत,अशा खेळाडूंना आर्चरी,शुटींग,ज्युडो,मैदानी,व्हाँलीबॉल,बॉक्सिंग या खेंळाच्या प्रवेशप्रक्रिया निवडचाचणी मध्ये सहभागी होता येईल.
  निवड झालेल्या खेळाडू यांचा शिक्षणाचा,गणवेश,पुस्तके,वसतिगृह,भोजन व दैनंदिन पूरक  आहार तसेच क्रीडा गणवेश,स्पर्धा,तंत्रशुध्द प्रशिक्षण,वैद्यकीय सुविधा सुरक्षा विम्यासह सर्व खर्च केंद्र शासनामार्फत करण्यात येईल.तरी कार्यक्रम खालील प्रमाणे निश्चित केला आहे.
खेळामधील संभाव्य प्रतिभा सर्वसाधारण खेळाडू  व खेळनिहाय खेळाडू प्रवेश निवड प्रक्रिया:-
  १० ते १४ वर्षे वयोगटातील तरूण प्रतिभावान खेळाडूंची शास्त्रोक्त पद्धतीने बँटरी ऑफ टेस्ट चाचणी द्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. प्रस्तावित कार्यक्रम व वयोमर्यादा खालील प्रामाणे आहे.
वयोमर्यादा :
वर्ग वय कििमान  मार्च २०१९ रोजी.   कमाल वयोमर्यादा ३१ मार्च २०१९ रोजी
                                                                                         
 6 वी               १० वर्षे                                         १२ वर्षे
7 वी.               ११ वर्षे                                         १३ वर्षे
8 वी                १२ वर्षे              b                               १४ वर्षे
प्रस्तावित कार्यक्रम:
अनु क्र चाचणी दि प्रवेशाकरिता शाळा चाचणी प्रशिक्षणार्थी श्रेणी  ठिकाण वेळ संपर्क क्र
२१/०७/२०१९ के व्ही -१ दिल्ली व गाझियाबाद शास्त्रोक्त बँटरी ऑफ टेस्ट सर्वसाधारण खेळाडू (मुले आणि मुली) भारतीय खेळ प्राधिकरण,एन बी ए रोहतक सकाळी ७ वा श्री सतीश सरहदी
९८८८७२५५७६
sainbartk@gmail.com

२२/०७/२०१९ के व्ही, गाझियाबाद मैदानी –जम्पस आणि थ्रो व  व्हाँलीबॉल(फक्त मुले ) खेळनिहाय कौशल्य चाचणी  भारतीय खेळ प्राधिकरण,एन बी ए रोहतक सकाळी ७ वा
२३/०७/२०१९ के व्ही -१ दिल्ली आर्चरी व जुडो (फक्त मुली ) खेळनिहाय कौशल्य चाचणी  भारतीय खेळ प्राधिकरण,एन बी ए रोहतक सकाळी ७ वा
  सरळ प्रवेश प्रक्रीया वा खेळनिहाय कौशल्य चाचणी मध्ये सहभागी होणे करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, येथे प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत व कामकाजा दिवशी दिनांक १९/०७/२०१९ पर्यंत संपर्क साधून आपले नाव नोंदवणे बंधनकारक असेल तसेच खेळाडूंनीसोबत येताना शाळेचे बोनाफ़ाईड प्रमाणपत्र,जन्म तारखेचा दाखला,पालकांचा रहिवासी दाखला, दोन नवीन रंगीत फोटो,सध्या शिकत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्या सहीचे ओळखपत्र प्रवेश अर्ज व संबंधीत स्पर्धेचे प्राविण्य/सहभाग प्रमाणपत्र(फक्त खेळनिहाय चाचणी करीता )  उपस्थितीच्या ठकाणी सादर करावे. पत्ता- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,शारीरिक शिक्षण महाविध्यालय परिसर,कांदिविली (पू) संपर्क क्र.०२२-२८८७११०५. dsomumbaisub@gmail.com नोंदवावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर यांनी केले आहे.      अधिक माहितीसाठी संपर्क 9511788818/7506727051

1 comment:

  1. Did any degree is required for the sports coach? In jobads, I seen and applied for Sports coach job vacancy in army school.

    ReplyDelete