10 वी व 12 वी चे ग्रेस मार्क
🛑सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की 10 वी व 12 वी ग्रेस मार्क चे प्रस्ताव ज्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कांदिवली येथे पाठवले आहेत व ज्यांचे प्रस्ताव कार्यालयात सादर करावयाचे आहेत अशा शाळेंनी उद्या दि ०६/०५/२०२० रोजी प्रस्ताव परिपूर्ण व विहित नमुन्यात असल्याची खात्री करूनच सदर प्रस्ताव उद्या सकाळी १०:०० ते १:०० या वेळेत सादर करावी. अपूर्ण प्रस्तावांची दखल घेतली जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
......संघटनेचे प्रस्ताव .....
🛑 ज्या शिक्षकांना खेळाडूंचे संघटनेचे ग्रेस गुणांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथे सादर करावयाचे आहेत त्यांनी ते व्यवस्थित विहित नमुन्यामध्ये संघटनेच्या सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक ०६ मे २०२०रोजी सकाळी १० ते १:०० या वेळेत तीन प्रतींमध्ये कार्यालयात सादर करावे.
🛑 संबंधित खेळाच्या जिल्हा किंवा राज्य संघटनेने त्यांचे स्पर्धेचे रिझल्ट ,स्कोर शिट व स्पर्धेची कागदपत्रे व फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये सादर केले नसल्या कारणाने एखादा खेळाडू ग्रेस मार्क पासून वंचित राहिला तर त्या नुकसानची जबाबदारी संबंधित जिल्हा व राज्य संघटनेची राहील . जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर या बाबत कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही याची सर्व शिक्षकांनी व पालकांनी नोंद घ्यायची आहे.
*तरी सर्वांनी social distancing ,Mask,या सर्व आवश्यक गोष्टींची खबरदारी घेऊन स्वतःची व इतरांची काळजी करून सुरक्षित अंतर ठेऊन शिस्तीचे पालन करून प्रस्ताव सादर करावे.*
जिल्हा क्रीडा अधिकारी , मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment