Wednesday, January 20, 2021

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१९-२० -: पुरस्कार विजेत्यांची नावे आणि कार्यक्रमाबाबतची माहिती

 

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०१९ - २० मुंबई उपनगर जिल्हा.

 

जिल्हयातील गुणवंत क्रीडापटु आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात येते. या पुरस्कारामध्ये रोख रुपये १०,०००/-; प्रमाणपत्र आणि सम्नानचिन्ह दिले जाते.

 

              त्यानुसार सन २०१९-२० या  वर्षांच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी ( गुणवंत खेळाडु पुरुष;  गुणवंत खेळाडु महिला; गुणवंत दिव्यांग खेळाडु आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक) खालीलप्रमाणे आहेत.

 

अ.क्र.

क्रीडा पुरस्कारार्थीचे नाव व खेळ

पुरस्काराचे नाव

 

आदित्य गोकुळ पाटील

(मल्लखांब)

गुणवंत पुरुष खेळाडु

 

मेधाली संदिप रेडकर

(डायव्हिंग जलतरण)

गुणवंत महिला खेळाडु

 

मार्क धरमाई जोसेफ

(पॅरा बॅडमिंटन)

गुणवंत दिव्यांग खेळाडु

 

सुनिल गुलाब गंगावणे

(मल्लखांब)

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक

 

निलेश बाळकृष्ण गराटे

(पॉवरलिफ्टींग)

गुणवंत  खेळाडु

थेट पुरस्कार

 

              सदर पुरस्कारांचे वितरण मा. ना. श्री. आदित्य उध्दव ठाकरे मंत्री, पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा  यांच्या शुभहस्ते तसेच मा. श्री. मिलिंद बोरीकर, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजीसकाळी ०.०० वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण, प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, बांद्रा (पुर्व) मुंबई ४०००५१ येथे संपन्न होणार आहे.कोविड १९ करोनाच्या पार्श्वभुमीवर सदर पुरस्कार विजेत्यांना विनंती करण्यात येते की, या कार्यक्रमासाठी पुरस्कार विजेत्यांनी आपल्या सोबत केवळ दोनच व्यक्तींना या कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जाईल.  दोन व्यक्ती व्यतिरिक्त येणा-या इतर व्यक्तींना कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसेच कार्यक्रमासाठी सकाळी ०८.०० वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावे. यास्तव आपणास विनंती करण्यात येते की कार्यक्रमासाठी अनावश्यक गर्दी करुन नये. तसेच करोनाच्या पार्शवभुमीवर सर्व आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाय योजना करुन पुरस्कार विजेत्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. (उदा. मुखपट्टी, हँड सॅनिटायझर आणि सामजिक अंतर)

 

 

 

No comments:

Post a Comment