महाराष्ट्र शासन
जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई
उपनगर
शासकीय
शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, अकुर्ली
रोड, कांदिवली पूर्व, मुंबई
दूरध्वनी क्रमांक -
०२२-२८८७११०५ ईमेल - dsomumbaisub@gmail.com
जा.क्र./जिक्र /मुउप/जियुवाम-२०२२ /713 दिनांक:- २९/१२/२०२१
प्रति,
मा.
प्राचार्य / मुख्याध्यापक / अध्यक्ष /सचिव(शाळा,महाविध्यालय,युवक
मंडळे)
जि.मुंबई
उपनगर
विषय:-
जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन सन २०२१-२२ करणे बाबत...
संदर्भ :-
संचालनालयचे पत्र क्र.यूकयों/जिविरायुवामहो/आयोजन/२१-२२/का-१० दिनांक
२४ डिसेंबर २०२१
महोदय,
उपरोक्त संदर्भीय पत्राच्या विषयान्वये आपणास
कळविण्यात येते कि, राज्यातील
युवकांमध्ये एकत्मकतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या
माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासन मार्फत सन
१९९४ या वर्षापासून दरवर्षी दिनांक १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे
आयोजन करण्यात येते.
देशातील संस्कृती व परंपरा जतन करून या
संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रतीनिधीक युवा संघ वरील राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये
सहभागी होतो,त्यानुसार सन २०२१-२२ या वर्षाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक ०३/०१/२०२२ रोजी करण्यात
येणार आहे. यासाठी गुगल मिट किंवा झूम या
अॅपवर सदर जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आपले प्रवेश
अर्ज दिनांक ३१/१२/२०२१ रोजी dsomumbaisub2020@gmail.com या मेल आय डी वर सादर करण्यात यावा.आपल्या शाळा/ महाविद्यालय/युवक मंडळे यातील इच्छुक कलावंतांना /
स्पर्धकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याबाबत आवाहन आपल्या मार्फत
करण्यात यावे, हि विनंती.
आपला विश्वासू ,
(अभय चव्हाण)
जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई उपनगर
जिल्हास्तरीय युवा महोत्सव सन
२०२१-२२
अ.क्र |
स्पर्धेतील
बाबी ( फक्त
सांघिक) |
संघ (कलाकार
संख्या मर्यादा) |
वेळेची
मर्यादा |
१ |
लोकनृत्य |
२० |
१५
मिनिटे |
२ |
लोकगीत |
१० |
०७
मिनिटे |
स्पर्धेबाबत
महत्वाच्या सूचना -
१.
स्पर्धकांसाठी/ कलाकारांसाठी वयोगट १५ ते २९ वर्षे असा राहील. वय दिनांक १२
जानेवारी २०२२ रोजी किमान १५ जास्तीत जास्त २९ असावे.
२.
स्पर्धकाने नाव नोंदणी करताना प्रवेशिके सोबत आपले आधार कार्ड व जन्माचा दाखला
जोडणे आवश्यक आहे. या साठी शाळेचे ओळखपत्र ग्राहय धरता येणार नाही. स्पर्धकाचे वय
दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी १५ ते २९ वर्ष असावे.
3. स्पर्धकांनी
आपली नावे नोंदणी करताना आपले प्रवेश dsomumbaisub2020@gmail.com या ईमेल आय डी वर सादर करावे. प्रवेश अर्ज सादर करताना त्यावर
आपला वॉट्सअप क्रमांक असणे आवश्यक आहे.
४.
कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार नाही याची
सर्वांनी नोंद घ्यावी.
५. ज्या
स्पर्धकांचे अर्ज दिनांक ३१/१२/२०२१ रोजी पर्यंत सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत वरील
ईमेल वर येतील त्याच स्पर्धकांना कला सादर करण्याकरीता स्पर्धकांच्या वॉट्सअप क्रमांकवर लिंक पाठविण्यात येईल. स्पर्धा दिनांक
०३/०१/२०२२ रोजी होईल.
६.
दिलेल्या वेळे व्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धकास ऑनलाईन सादरीकरणाची परवानगी देण्यात
येणार नाही याची नोंद घ्यावी व दिलेल्या वेळेतच आपले सादरीकरण करावे.
७. सादर
केलेल्या बाबींची व्हिडियो क्लिप तयार करूनdsomumbaisub2020@gmail.com या ईमेल वर परफॉर्मन्स झाल्यावर लगेच
पाठवावे.
८. आपली
कला सादर करताना विद्युत पुरवठा खंडित होऊन आपले सादरीकरणात व्यत्यय येणार नाही
याची खबरदारी स्पर्धकांनी स्वतः घ्यायची आहे. असे झाल्यास सर्वस्वी आपली जबाबदारी
राहील. त्यामुळे शक्यतो लॅपटॉप/मोबाईल चा वापर करावा.
९.
परीक्षणाबाबत कोणताही आक्षेप घेता येणार नाही.
१०.
प्रतिस्पर्धी कलाकारांबाबत काहीही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिशी त्याच
वेळी आक्षेप ऑनलाइन सिद्ध करणे आवश्यक राहील.
११.
कलाकारांना कला सादर करताना कोणत्याही प्रकरची इजा / दुखापत झाल्यास त्यास आयोजन
समिती जबाबदार राहाणार नाही.
१२.
ऑनलाईन कला सादर करताना सहभागी कलाकारांनी आपल्या वयाचा मूळ दाखला सोबत ठेवावा.
१३.
एका कलाकारास एका बाबीत फक्त एकाच वेळेस सहभागी होता येईल. एका पेक्षा जास्त बाबीत
सहभागी होता येणार नाही.
सोबत प्रवेशिका नमुना फॉर्म
जोडत आहे.प्रवेशिका दि ३१/१२/२०३१ पर्यंत समक्ष कार्यालयात किंवा dsomumbaisub2020@gmail.com सायंकाळी
५:०० वाजेपर्यंत पाठविण्यात यावी.
संघ प्रवेशिका(नमुना)
शाळा/कॉलेज/संस्था/युवक मंडळाचे नाव
-_________________________________
_____________________________________________________________
संपूर्ण पत्ता
-____________________________________________________
______________________________________________________________
मोबाईल क्रमांक _________________ whatsapp नंबर आवश्यक _____________
संघ व्यवस्थापक ई मेल आय
डी_______________________________________
बाबीचे नाव
______________________________________________________
अनु
क्र |
स्पर्धकाचे
पूर्ण नाव |
जन्मतारीख
|
१२
जानेवारी २०२२ रोजीचे वय वर्ष
__महिने ___दिवस __ |
पुरुष/स्त्री |
आधारकार्ड नं |
|
|
|
|
|
|
संस्था प्रमुख सही
/शिक्का