Wednesday, September 7, 2022

केंद्र शासनाचे क्रीडा पुरस्कार २०२२

 

अत्यंत महत्त्वाचे


       मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विदयापीठांकरिता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन  अर्वार्ड, २०२२ करिता नामांकनाकरिता नामनिर्देशन प्रस्ताव दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्रशासनास सादर करण्याबाबत सुचित केलेले आहे. तसेच विहीत कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपुर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही असे नमुद केलेले आहे.  तसेच या वर्षीपासुन पात्र खेळाडुंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारेच आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची / अथवा व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर / वेबसाईटवर सादर करावे, असेही सुचित केलेले आहे. तसेच ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण असल्यास Departmental of Sports at section.sp4-moyas@gov.in किंवा ०११-२३३८७४३२ या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी ०९.०० ते सायं. ०५.३० पर्यंत संपर्क करावा. तसेच केंद्र शासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती, नियमावली व विहीत नमुना अर्ज http://yas.nic.in/sports या बेवसाईइटवर उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment