Thursday, January 8, 2026

**राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना(वय पडताळणी – शासकीय रुग्णालय बाबत)**

**राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

(वय पडताळणी – शासकीय रुग्णालय बाबत)**

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या वय पडताळणी प्रक्रियेसाठी, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयात वय पडताळणी चाचणी करण्याकरिता खालीलप्रमाणे लेखी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.

विद्यार्थ्यांनी DSO कार्यालयात सादर करावयाची कागदपत्रे:

1. लेखी अर्ज / पत्र, ज्यामध्ये खालील माहिती स्पष्टपणे नमूद असावी:

विद्यार्थ्याचे पूर्ण नाव

जन्मतारीख

वय पडताळणीसाठी अपेक्षित शासकीय रुग्णालयाचे नाव



2. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड पत्राची प्रत



वरील अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला त्या विशिष्ट शासकीय रुग्णालयासाठी अधिकृत शिफारस / परवानगी पत्र DSO कार्यालयाकडून दिले जाईल.
DSO कार्यालयाकडून दिलेल्या पत्राशिवाय शासकीय रुग्णालयात वय पडताळणी प्रक्रिया केली जाणार नाही.

सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी वरील प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून पुढील कार्यवाही वेळेत पार पडेल.

Wednesday, January 7, 2026

राज्यस्तर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण




राज्यस्तर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २५- २६  प्राविण्य प्रमाणपत्र वितरण
१. निर्मय यतीन करडे -टपीभेन छगनलाल लालजी वालिया जुनियर कॉलेज मुंबई
२. युगांक दीपक बुचांडे - व्ही पी एम कन्नड हाय अँड कनिष्ठ महाविद्यालय मुंबई
३. सिमरन संजय बेहरा - सेंट झेवियर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मुंबई
४. ऋचा राजेश शेठ - मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई
५. सृष्टी संजय चव्हाण - लोईस युनिव्हर्सल कॉ गोरेगाव वेस्ट मुंबई
६. रोशनी राजश्री मोहिते - श्री लालजी वेलची अंगरवाला सर्वोच्च विद्यालय मुंबई

राज्यस्तर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २५- २६  सहभाग प्रमाणपत्र वितरण
१. शौर्य भगवती लाल मेनारिया - केनिया अँड अँकर इंग्लिश स्कूल मुंबई
२. प्रारंभ सचिन प्रभू - तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई
३. अनन्या अंकुश कटके - गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मुंबई
४. वेदा संतोष सावंत - निर्मला मेमोरियल फाउंडेशन ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स मुंबई
५. सार्थक सूर्यकांत साजगाने - सेंट जॉर्ज हायस्कूल मुंबई उपनगर
६. प्रतीक्षा अरुण विश्वकर्मा - सेंट अँथनी हायस्कूल


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे द्वारे  विभागीय क्रीडा संकुल यवतमा पुणे येथे झालेल्या राज्यस्तर कराटे स्पर्धा प्रमाणपत्र वितरण सन २५-२६ या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र असल्यास आपण त्वरित जिल्हा  क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.

Wednesday, December 31, 2025

महत्त्वाची सूचना

जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर कार्यालयामार्फत राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा राजहंस विद्यालय डी एन रोड भवन कॉलेज जवळ मुंशी नगर अंधेरी पश्चिम मुंबई - ४०००५८ येथे दिनांक २,३,४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित केलेले असल्याने कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी सदर स्पर्धे ठिकाणी जाणार आहेत. स्पर्धे संदर्भातील कोणास काम असल्यास दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा वाजेपर्यंत कार्यालयात संपर्क साधावा किंवा त्यांनी स्पर्धा ठिकाणी संपर्क साधावा

Friday, December 26, 2025

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025-26*

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय  टेनिस क्रिकेट  स्पर्धा 2025-26*
--------------
*आयोजक*
टेनिस क्रिकेट असोसिएशन मुंबई उपनगर
-------------
स्पर्धा दिनांक.
*३०/१२/२०२६
***************

*स्पर्धा ठिकाण.*

* ओव्हल मैदान चर्चगेट

*स्पर्धा स्वरूप*

*17 वर्षाआतील मुले व मुली*
*19 वर्षाआतील मुले व मुली*

*सर्व सहभागी स्पर्धक १७ व १९ वर्षाखालील मुले सकाळी ८.३० ते ९.३०या वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी रिपोर्ट करतील.
*सर्व सहभागी स्पर्धक १७ व १९ वर्षाखालील मुली १० ते १०.३०या वेळेत रिपोर्ट करतील

***************

*इच्छुक खेळाडू त्यांचे प्रवेशिका त्याचे  शाळा वा महाविद्यालयांचे मार्फतीने विहित वेळेत अचूक माहित भरून पाठवतील.*

*प्रवेशिका शाळा /कॉलेजने न भरल्यास स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.*

*प्रवेशिका अपूर्ण अथवा चुकीच्या भरल्यास त्या खेळाडूंची प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.*

*महत्त्वाचे डॉक्युमेंट*

*खेळाडूंनी सोबत प्लेयर आयडी घेऊन यावे*

*1 ते 5 वर्षाच्या आतील जन्म दाखला सोबत आणणे अनिवार्य आहे*

*इयत्ता पहिलीचा जनरल रजिस्टर नंबर खेळाडूंनी आणणे आवश्यक आहे*
स्पर्धेची भाग्य पत्रिका स्पर्धेच्या ठिकाणी टाकली जाईल. 
स्पर्धेला येताना सर्व संघाने हार्ड टेनिस बॉल घेऊन येणे.

*अधिक माहिती साठी संपर्क*

*स्पर्धा प्रमुख*

*श्री. अभिजीत गुरव*
*8108614911*
*क्रीडा कार्यकारी अधिकारी*

*स्पर्धा नियोजक*
*संदीप पाटील 
8369731872
TCAM सेक्रेटरी*

Friday, December 19, 2025

विभागस्तरीय सायकलींग स्पर्धा 2025-26

📢 महत्वाची सूचना

*🚴 मुंबई विभागस्तरीय शालेय सायकलिंग क्रीडा स्पर्धा २०२५-२६ 🚴‍♀️*

*वयोगट - १४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली*

                🔹 *स्पर्धा कार्यक्रम* 🔹
  
*🔶 दिनांक:- २४ डिसेंबर २०२५, बुधवार* 

*🔷 उपस्थिती वेळ:- सकाळी ठिक ७.३० वाजता*   

*🔶 स्थळ:- STP प्रोजेक्ट, आंबिवली गांव, आंबिवली-टिटवाळा ९० फुटी रस्ता, आंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे*
*(नजिकचे रेल्वे स्टेशन - आंबिवली)*

✅ *सोबत आणावयाची कागदपत्रे:-*

* प्रत्येक खेळाडूचे Eligibility Form (वैयक्तिक ओळखपत्र) ज्यावर खेळाचे नाव, जिल्हा क्रीडा अधिकारी यांची सही व शिक्का प्रिंट झालेले असावे.
 १. सर्व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेसाठी येताना आपल्या शाळेच्या खेळाडूंची यादी व सर्व खेळाडूंची ओळखपत्रे सोबत आणावीत.
२. शाळेकडून आलेल्या क्रीडा शिक्षकांनी त्यांचे शाळेचे आयडी कार्ड सोबत आणावे अथवा प्रशिक्षक असल्यास शाळेने प्राधिकृत केलेबाबतचे पत्र आणावे.

🚲 *महत्वाच्या सूचना:-* 🚲

*१) खेळाडूंना टाईम स्टार्ट किंवा मास स्टार्ट यापैकी कोणत्याही एकाच प्रकारात सहभागी होता येईल.*

*२) स्पर्धेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. उदा. १४ वर्षाखालील मुले/मुली यांनी ९० चा रेशो फॉलो करायचा आहे. स्पर्धेत आवश्यक असलेल्या आपल्या सायकलच्या स्पीड संबंधी सर्व सेटिंग्ज स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच करून आणायच्या आहेत, जेणेकरून स्पर्धेच्या ठिकाणी विलंब होणार नाही.*

📌 शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडूंची वयनिश्चिती करण्यासाठी खालील सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
*१. संबंधित खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला.*
*२. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत.*
*३. आधार कार्ड*

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. सिद्धार्थ वाघमारे, क्रीडा अधिकारी, ठाणे - ९८७०८९८६८०

Saturday, December 13, 2025

जिल्हा स्तरीय शालेय तांग सू डो क्रीडा स्पर्धा २०२५-२६

*जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, तसेच तांग सू डो असोसिएशन ऑफ मुंबई सबर्बन आयोजित मुंबई उपनगर जिल्हा स्तरीय शालेय तांग सू डो क्रीडा स्पर्धा २०२५-२६* 

*स्पर्धेची तारीख व उपस्थिती* : २० डिसेंबर, २०२५, शनिवार, दुपारी १२:३० वा.

*स्थळ*:- ठाकूर विद्या मंदिर हायस्कूल, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई - १०१.

 *वयोगट :*
१) १४ वर्षा आतील मुले व मुली
२) १७ वर्षाआतील मुले व मुली
३) १९ वर्षाआतील मुले व मुली

*वैयक्तिक प्रकार:* स्पारिंग (फाईट)
*तांग सू डो या खेळ प्रकारात एका शाळेतून एका वजन गटात फक्त दोन खेळाडू खेळू शकतात.*

*स्पर्धा साहित्य:* स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य (उदा. हेड गार्ड, चेस्ट गार्ड व इतर आवश्यक साहित्य *खेळाडूंनी स्वतः घेऊन येणे.*

*– महत्वाची माहिती*
*•ओळखपत्राबाबत सूचना:*

*सर्व खेळाडूंनी शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.*

*ओळखपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असणे अनिवार्य.*

➡ *जिल्हा/विभागीय स्पर्धेसाठी खालील कागदपत्रे अत्यावश्यक आहेत*.
     जिल्हा/विभागीय स्पर्धेसाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जन्मतारखे बाबत खालील कागदपत्रे पुराव्यासहित खेळाडूसोबत असणे बंधनकारक आहे.
अ) खेळाडूने पुढील कागदपत्रे सोबत स्पर्धा स्थळी आणणे अनिवार्य आहे. 
 १. प्रवेशिका (प्लेयर आयडी)
 २. आधार कार्ड 
 ३. जन्म झाला तेव्हापासून पाच वर्षाच्या आतला शासकीय विभागाने दिलेला जन्म दाखला 
 ४. इयत्ता पहिलीतील जनरल रजिस्टर मधील नोंदणीची सत्यप्रत. 
कृपया याची नोंद घ्यावी...🙏

*अधिक माहिती व सूचनांसाठी:*

*प्रिती टेमघरे - ९०२९२५०२६८*
*क्रीडा कार्यकारी अधिकारी, मुंबई उपनगर*

*स्पर्धा आयोजक* 
*रॉकी डिसोजा- ९८७०९२३४७१*
*सुभाष मोहिते- ९९६९१११५११*