*🚴 मुंबई विभागस्तरीय शालेय सायकलिंग क्रीडा स्पर्धा २०२५-२६ 🚴♀️*
*वयोगट - १४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली*
🔹 *स्पर्धा कार्यक्रम* 🔹
*🔶 दिनांक:- २४ डिसेंबर २०२५, बुधवार*
*🔷 उपस्थिती वेळ:- सकाळी ठिक ७.३० वाजता*
*🔶 स्थळ:- STP प्रोजेक्ट, आंबिवली गांव, आंबिवली-टिटवाळा ९० फुटी रस्ता, आंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे*
*(नजिकचे रेल्वे स्टेशन - आंबिवली)*
✅ *सोबत आणावयाची कागदपत्रे:-*
* प्रत्येक खेळाडूचे Eligibility Form (वैयक्तिक ओळखपत्र) ज्यावर खेळाचे नाव, जिल्हा क्रीडा अधिकारी यांची सही व शिक्का प्रिंट झालेले असावे.
१. सर्व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेसाठी येताना आपल्या शाळेच्या खेळाडूंची यादी व सर्व खेळाडूंची ओळखपत्रे सोबत आणावीत.
२. शाळेकडून आलेल्या क्रीडा शिक्षकांनी त्यांचे शाळेचे आयडी कार्ड सोबत आणावे अथवा प्रशिक्षक असल्यास शाळेने प्राधिकृत केलेबाबतचे पत्र आणावे.
🚲 *महत्वाच्या सूचना:-* 🚲
*१) खेळाडूंना टाईम स्टार्ट किंवा मास स्टार्ट यापैकी कोणत्याही एकाच प्रकारात सहभागी होता येईल.*
*२) स्पर्धेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. उदा. १४ वर्षाखालील मुले/मुली यांनी ९० चा रेशो फॉलो करायचा आहे. स्पर्धेत आवश्यक असलेल्या आपल्या सायकलच्या स्पीड संबंधी सर्व सेटिंग्ज स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच करून आणायच्या आहेत, जेणेकरून स्पर्धेच्या ठिकाणी विलंब होणार नाही.*
📌 शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडूंची वयनिश्चिती करण्यासाठी खालील सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
*१. संबंधित खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला.*
*२. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत.*
*३. आधार कार्ड*
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. सिद्धार्थ वाघमारे, क्रीडा अधिकारी, ठाणे - ९८७०८९८६८०
No comments:
Post a Comment