Monday, June 14, 2021

Grace marks Instructions - सवलतीचे क्रीडा गुण नियमावली

 क्रीडा सवलत गुण प्रस्ताव सादर करण्यासाठी महत्वाच्या मार्गदर्शक सुचना. 

१) इयत्ता १० वी SSC मध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यास इ. ८ वी. ९ वी मध्ये शिकत असताना क्रीडा स्पर्धा (जिल्हा / विभाग स्तरीय स्पर्धेत प्राविण्य) व (राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्राविण्य / सहभाग) सहभागी झालेल्या उच्चतम स्तराच्या स्पर्धेचा लाभ क्रीडा सवलत गुण करीता घेता येईल.

२) इयत्ता १२ वी HSC मध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यास इ. ११ वी मध्ये शिकत असताना क्रीडा स्पर्धेत (जिल्हा / विभाग स्तरीय स्पर्धेत प्राविण्य) व (राज्य / राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्राविण्य / सहभाग) सहभागी झालेल्या उच्चतम स्तराच्या स्पर्धेचा लाभ क्रीडा सवलत गुण करीता घेता येईल...

३) इ. १० वी व इ. १२ वी मध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने एकापेक्षा जास्त स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असले तरी सदर खेळाडू उच्चतम अशा एकाच स्पर्धेच्या गुणास पात्र असेल.

४) जे खेळाडू विद्यार्थी क्लबकडून थेट राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले असतील तर ते खेळाडू क्रीडा गुणास पात्र असणार नाहीत.

५)( शाले क्रीडा स्पर्धा व मान्यता प्राप्त एकविध खेळ संघटनेव्दारा स्पर्धा ) जिल्हा / विभाग स्तरावरील स्पर्धेत प्राविण्य प्रथम / व्दितीय / तृतीय क्रमांकापर्यंतचे ) व ( राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्राविण्य प्रथम / व्दितीय / तृतीयव सहभाग हे खेळाडू क्रीडा सवलत गुणाकरीता पात्र राहतील.

)शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत संबंधित जिल्हयातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यातील प्रस्ताव दोन प्रतीत, दि. जून, २०२१ ते सोमवार दि २१ जून, २०२१ या कालावधीत(शनिवार व रविवार वगळून) सकाळी १०:३० ते दुपारी ३:०० सादर करावे.

७)संबंधित शाळा / महाविध्यालय यांनी  विभागीय मंडळाकडे परिपूर्ण प्रस्ताव व यादी मंगळवार, दि.१५ जून, २०२१ ते शुक्रवार दि. २जून, २०२१ या कालावधीत सादर करावे. तसेच क्र. ६ व ७ मध्ये नमुद केलेल्या कालावधीत कोणत्याही प्रकारची मुदत वाढ केली जाणार नाही असे मा. सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.                 

 ८)                                                               परिशिष्ट- ई

अनु क्र

खेळाडूचे नाव

खेळाचा  प्रकार

बैठक क्रमांक

स्पर्धेचा स्तर (राज्य/राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय )

स्पर्धेतील प्राविण्य

स्पर्धा आयोजक

(शालेय /संघटना )

प्राप्त केलेले गुण

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

     

शैक्षणिक संस्थेने सर्व खेळाडूंचे एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव दोन प्रतीत, शैक्षणिक संस्थेच्या लेटर हेडवर खेळाडूंची एकत्रित यादी, विभागीय मंडळाकडून प्राप्त झालेल्या बैठक क्रमांकाच्या यादीसह खेळाडूचे नाव ठळक(highlight) करून वर दिलेल्या तक्त्यानुसार मराठीत टाईप करून या कार्यालयात जमा करावी.त्याचबरोबर खेळाडूंची एकत्रित यादी वरील तक्त्यानुसार MS-WORD फाईल मध्ये dsomumbaisub2020@gmail.com मेल करणे अनिवार्य आहे .

                                                

९) प्रस्ताव सादर करताना शैक्षणिक संस्थेने  क्रीडा शिक्षक अथवा संबधित शैक्षणिक संस्थेचा   कर्मचारी वर्ग यांचे मार्फतच कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात यावेत, असेच प्रस्ताव कार्यालयात स्वीकारले जातील.खेळाडू व पालक यांना कार्यालयात पाठवू नये.

१०) जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडून परिपूर्ण प्रस्तावांवर स्वाक्षरी झाल्यानंतर सदर परिपूर्ण प्रस्ताव   खेळाडू यादी व प्रस्ताव घेऊन जाणेकरीता दिनांक,वेळ या dsomumbaisub.blogspot.com ब्लॉगवर प्रसिध्द करण्यात येईल.प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे जमा करण्याची सर्वस्वी जबाबदारी हि संबधित शैक्षणिक संस्थेची राहील.

      कृपया सर्वांनी कोविड १९ या रोगामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे दिलेल्या वेळेचे पालन करावे कार्यालयात येताना मास्क,सँनिटायझर,हँडग्लोव्हस याचा वापर करावा.

2 comments:

  1. If in std 11th DSO matches was not taken due to covid situation, then whether 10th merit certificates of SGFI valid for grace marks ? ( grace marks benefit not taken in 10th)

    ReplyDelete
  2. Read the Latest News On Entertainment, technology, finance, insurance, Sports & Much More From India And Around The World At Trending News Worldwide.

    ReplyDelete