Thursday, October 20, 2022

पेमेंट गेट सुरु झाल्याबाबत

  अत्यंत महत्वाची सुचना

सर्व शाळा महाविदयालयांना कळविण्यात येते की, सन २०२२-२३ हया वर्षासाठीच्या शालेय क्रीडा स्पर्धेसाठीची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांचेकडुन प्राथमिक प्रवेशिका दिनांक १७/१०/२०२२ पासुन सुरु करण्यात आलेली आहे. सदर प्रवेशिकेमध्ये नमुद केलेल्या खेळांमध्ये आप आपल्या शाळा महाविदयालयामधील खेळाडूंचा सहभाग निश्चित करण्यात यावा. सदर प्रवेशिकेमध्ये माहिती भरताना खेळाडूंची विहीत पध्दतीने निवड चाचणी आयोजित करुन अथवा खेळाडूंना विचारुन त्यांचा खेळ प्रकार व त्याचा उपप्रकार, वयोगट, वजनगट, इयत्ता, जन्मतारीख आणि खेळाडुचे आणि शाळेचे मराठी नाव हे काळजीपुर्वक भरावे. एकदा माहिती भरल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याची स्पष्टपणे सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच सदर प्राथमिक प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख ही ०५/११/२०२२ ही आहे याचीही सर्वांनी नोंद घ्यावी. स्पर्धेसाठी खेळ प्रकार निहाय फी (पेमेंट गेट वे) सुरु झाले आहे. ज्या शाळांना शालेय क्रीडा स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्या शाळांनी खालील फी नुसार संलग्नता शुल्क आणि क्रीडा निधी यासह खेळनिहाय फी भरुन आपल्या शाळेचा स्पर्धेमधील प्रवेश निश्चित करावा.

फी चा तक्ता खालीलप्रमाणे आहे.

फी बाबत :- नोंदणी शुल्क व प्रवेश फ़ी विद्यार्थी संख्येनुसार प्राथमिक /माध्यमिक शाळा व कनिष्ठ     

     महाविद्यालयांनी भरावयाचे शुल्क खालीलप्रमाणे आहे.

अ.नु

विद्यार्थी संख्या

भरावयाचे संलग्नता शुल्क (रुपये)

क्रिडा निधी (रुपये)

1.

1 ते 500

100/-

250/-/-

2.

501 ते 1000

150/-

450/-

3.

1001 ते 1500

200/-

550/-

4.

1501 ते 2000

250/-

600/-

5.

2001 ते 2500

300/-

750/-

6.

2500 पेक्षा जास्त विद्यार्थी

350/-

1000/-

 

प्रत्येक संघांसाठी प्रति संघ रु. 100/-  वैयक्तिक क्रीडा प्रकारातील प्रति बाब रू. 50/- तसेच खालील काही विशेष खेळबाबींसाठी पुढील प्रमाणे फी आकारण्यात येईल.

 1. क्रिकेट - रू. 400/-     2. फुटबॉल (सर्व) - रू.400/-  3. बॅडमिंटन - रू. 200/-     4. हॉकी (सर्व) - रू.400/-   5. लॉन टेनिस (प्रति खेळाडू) - रू. 100/-  6. बास्केटबॉल (प्रति संघ)- रू.200/- 7. रायफल शुटींग 

प्रति खेळाडु रु. १००/-  टेबल टेनिस प्रति संघ रु १५०/-

No comments:

Post a Comment