Thursday, September 7, 2017

महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन

महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन
   फुटबॉल मिशन वन मिलीयन उपक्रमाअंतर्गत मुंबई उपनगर जिल्हयातील प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक, महापालिका, सीबीएससी, आयसीएससी, आयजीएसई, आयबी शाळेतील मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक, तालुका क्रीडा संयोजक यांची एकत्रीत सभा जिल्हा शिक्षण निरीक्षक पश्चिम व दक्षिण विभाग, व जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय म्हणजेच कुर्ला तालुका  चेंबुर हायस्कुल, चेंबुर नाका,०९ सप्टेंबर २०१७ सकाळी 10.00 वाजता अंधेरी व बोरीवली तालुका, महात्मा गांधी विदयालय,बांद्रा येथे दुपारी 2.00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला येताना फुटबॉल मिशन वन मिलीयन अंतर्गत लिंकवर नोंदणी केलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या शाळांचा सहभाग अपेक्षीत आहे. या सभेला येताना आपल्या शाळेतील फुटबॉल कार्यक्रमात सहभागी होणा-या 50-100 खेळाडूंची यादी आधार कार्ड नंबर व जन्मतारखेसह पेनड्राईव्ह अथवा dsomumbaisub@gmail.com या मेलवर मेल करावी . नोंदणी केलेल्या शाळांना 3 फुटबॉल देण्यात येणार आहे. तसेच 15 सप्टेंबर 2017 रोजी आपल्या शाळेतील खेळाडूंना मैदानात फुटबॉल खेळवून त्यांचे फोटो व्हीडीओ या मेलवर पाठवीण्यात यावे, याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे.अजुनही ज्या शाळांनी ऑनलाईन माहीती भरली नाही त्यांना अजुन एक संधी आहे. लवकरच लिंक पुन्हा सुरू होणार आहे. आपल्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,स्लोगन तसेच शुभेच्छापत्र यांचे आयोजन करून त्याचा अहवाल सादर करावा अधीक माहीतीकरिता जिल्हाक्रीडा अधिकारी  कार्यालय, मुंबई उपनगर  022-28871105 या दुरध्वनीवर संपर्क साधावा.


No comments:

Post a Comment