Thursday, January 12, 2023

जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धा २०२२-२३

 जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धा २०२२-२३

नोंदणी आणि वजने -: दि. १९/०१/२०२३ दुपारी १.०० ते सायं. ४.३०

 

स्पर्धा -:

१९ वर्षाखालील मुले -: २१/०१/२०२३ उपस्थिती सकाळी ९.००, स्पर्धा सुरु -: सकाळी ९.३०

१७ वर्षाखालील मुले -: २१/०१/२०२३ उपस्थिती सकाळी १०.३०, स्पर्धा सुरु -: सकाळी ११.००

१४ वर्षाखालील मुले -: २१/०१/२०२३ उपस्थिती दुपारी ०१.३०, स्पर्धा सुरु -: दुपारी ०२.००

१९ वर्ष मुली -: २२/०१/२०२३ उपस्थिती सकाळी ९.००, स्पर्धा सुरु -: सकाळी ९.३०

१७ वर्ष मुली -: २२/०१/२०२३ उपस्थिती सकाळी १०.३०, स्पर्धा सुरु -: सकाळी ११.००

१४ वर्ष मुली -: २२/०१/२०२३ उपस्थिती दुपारी ०१.३०, स्पर्धा सुरु -: दुपारी ०२.००

 

वजने आणि स्पर्धा ठिकाण -: स्वामी विवेकानंद हायस्कुल हिंदी मिडीयम, शिवसृष्टी रोड, कुर्ला पुर्व, मुंबई ७१ ( कुर्ला नेहरुनगर एस टी डेपो जवळ.)

 

स्पर्धेच्या सूचना-:

 

१) खेळाडूंनी वजन व नोंदणी करताना प्रेवेशिका व खेळाडूचे स्पर्धेचे ओळखपत्र मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्यासह आणणे बंधनकारक आहे. वजने फक्त वजनाच्या दिवशीच होतील. वजनाला अनुपस्थितीत असणा-या खेळाडूंना प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेता येणार नाही याची स्पष्ट नोंद घ्यावी.

२) खेळाडूंनी दिलेल्या वेळेनुसार आणि आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

३) स्पर्धेला येताना खेळाडूंनी कोणत्याही मौल्यवान वस्तू सोबत आणु नयेत. जर त्या हरवल्यास तर त्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही.

३) खेळाडूंनी आवश्यक क्रीडा साहित्य, गणवेश यासह (मुलांसाठी सेंटरगार्ड आवश्यक) स्पर्धेला यावे.

४) शारीरिक शिक्षक अथवा शाळेच्या प्रतिनिधींनी त्यांचे ओळखपत्र स्पर्धेला येताना सोबत आणावे. अधिकृत व्यक्तींनाच स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. 

५) खेळाडु हा वैदयकीयदृष्टया सक्षम असावा. स्पर्धे दरम्यान कोणतीही दुखापत, जिवितहानी इ झाल्यास त्याला आयोजन समिती जबाबदार असणार नाही.

६) स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय अंतिम राहील याबाबत विनाकारण आयोजकांशी वाद घालु नये. अन्यथा संबंधित व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.

७) आयोजनाचे ठिकाण, वेळ, सामन्यांचा कालावधी इ बाबी ठरविण्याचे आणि त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजन समिती राखून ठेवत आहे. याबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.

८) स्पर्धा आयोजनाच्या ठिकाणी वेळोवेळी देण्यात येणा-या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन आयोजन समितीस स्पर्धा यशस्वी संपन्न करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.


स्पर्धा प्रमुख संपर्क -: मनोज हाते सर ९९६७३८५१६६, फिलिक्स सर - ९७६९८८३३६०, गणेश सर- ८८९८११६४८४

No comments:

Post a Comment