कृपया खालील शिवाछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराबाबतची टिपणी काळजीपुर्वक वाचावी. महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ डिसेंबर , २०२२ रोजी सुधारित नियमावली शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराबाबत प्रसिध्द केलेली आहे. त्यानुसार सन २०१९-२०, सन २०२०-२१ आणि २०२१-२२ हया तीन वर्षांकरिताच्या पुरस्कारांसाठी वर्षनिहाय स्वतंत्र पुरस्कार अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सदर पुरस्कारांसाठीचे अर्ज दिनांक १६ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करावेत. आणि मुंबई उपनगर जिल्हयातील अर्जदारांनी सदर अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शारीरिक शिक्षण महाविदयालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व, मुंबई ४००१०१ या ठिकाणी पुर्ण भरुन आणि आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयीन वेळेतच आणि शासकीय सुट्टी वगळता सादर करावेत.
सदर अर्ज विहीत नमुन्यातच आणि विहीत कालावधीत सादर करावेत. अर्ज सादर करताना त्यावर अर्जदाराचे नाव, पुर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ज्या पुरस्कारासाठी अर्ज केला आहे त्याचे नाव आणि वर्ष नमुद करणे आवश्यक आहे. सदर पुरस्कारासाठी अर्ज करताना कृपया दिनांक १४ डिसेंबर, २०२२ रोजीचा शासन निर्णय काळजीपुर्वक वाचुन आणि त्यामधील नियमावली वाचुनच अर्ज सादर करावेत. तसेच अर्जदाराने पोलीस विभागाकडील चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी अहवालासह अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विहीत वेळेत व विहीत नमुन्यात सादर करावा.
No comments:
Post a Comment