Friday, August 21, 2015

सुचना

ब-याच शाळा , कनिष्ठ महाविद्यालये आपल्या खेळाडू प्रवेशिका (Excel Sheets) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या e-mail id वर मेल द्वारे पाठवत आहेत. तालुकास्तरीय बैठकीत ठरल्या प्रमाणे या वर्षी सर्व खेळाच्या प्रवेशिका हार्ड कॉपी मध्ये प्राचार्य /प्राचार्या मुख्याध्यापक ,मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्या सह अंधेरी व बोरिवली तालुक्यातील शाळांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, आकुर्ली रोड , समता नगर पोलीस ठाणे शेजारी ,कांदिवली पूर्व या ठिकाणी तर कुर्ला तालुक्यातील शाळा, क. महाविद्यालयांनी तालुका क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय,एम.सी.सी कॉलेज शेजारी , मुलूंड प. या ठिकाणी प्रत्यक्ष जमा करावी. e-mail वर पाठविलेल्या प्रवेशिका या वर्षीतरी ग्राह्य धरले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. तसेच काही खेळांच्या स्पर्धा लवकर येत आहेत त्या प्रमाणे सदर ब्लॉग वर प्रकाशित करण्यात येणा-या माहितीच्य अधारे आपल्या प्रवेशिका लवकरात लवकर जमा करण्यात याव्यात .

No comments:

Post a Comment