महाराष्ट्र
शासन
जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई, उपनगर जिल्हा
शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर ,कांदिवली (पू).
मुंबई १०१
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जा.क्र.जिक्रीअ/शाक्रीस्प/आयोजन/२०१७-१८/२६९ दि:- १५/०६/२०१७
प्रति,
मा.प्राचार्य
/मुख्याध्यापक,
विषय:-सन २०१७-१८ शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठकीबाबत.
महाराष्ट्र
शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद,मुंबई उपनगर यांचे
संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत शालेय क्रीडा
स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.सन २०१७-१८ या वर्षातील जिल्हा,विभाग व राज्य
स्पर्धा आयोजन व नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी खालील कार्यक्रमाप्रमाणे
बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच तालुका, जिल्हा स्पर्धांचे ठिकाण निश्चित
करणे.
तालुका
|
बैठकीचा दिनांक
|
क्षेत्र
|
बैठकीचे स्थळ
|
बोरीवली
|
२८ जुन २०१७ रोजी सकाळी ११.०० वा.
|
बैठक हॉल
|
ठाकूर कनिष्ठ महाविद्यलय
ठाकूर विलेज,
कांदिवली (पु) मुंबई
|
अंधेरी
|
३० जुन २०१७ रोजी सकाळी ११.०० वा.
|
बैठक हॉल
|
नरसी मोनजी एज्यूकेशन ट्रस्ट
जमुनाबाई नरसी स्कुल
नरसी मोनजी भवन,
एन.एस.रोड नं.७
जे.वी.डी.स्कीम,
विले पार्ले (प.)मुंबई ४०००४९
|
कुर्ला
|
०४ जुलै २०१७ रोजी सकाळी ११.०० वा.
|
बैठक हॉल
|
चेंबूर हायस्कूल,
चेंबूर नाका,
चेंबूर,मुंबई
|
सन २०१७-१८ या शैक्षणीक वर्षापासून आयोजित होणाऱ्या सर्व
शालेय क्रीडा स्पर्धांचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याचे बंधनकारक
आहे.सदर बैठकीमध्ये ऑनलाईन कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे.या माहितीमध्ये
मुख्यत्वे विद्यार्थ्यांची प्रवेशिका नोंदणी व ऑनलाईन प्रकिया हाताळणी मार्गदर्शक
सूचना यांचा समावेश असणार आहे. तरी उपरोक्त प्रमाणे क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व
नियोजन विषयक बैठकीसाठी मा.प्राचार्य/मुख्याध्यापक, तसेच क्रीडा शिक्षक व संगणक
ऑपरेटर आपण किंवा आपल्या प्रतिनिधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. आपल्या शाळेच्या
विद्यार्थ्यांच्या शालेय स्पर्धांमध्ये सहभागासाठी सोयीचे आहे.त्याकरिता बैठकीस
उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
स्पर्धा
आयोजन नियोजन,क्रीडाविषयक प्रचार तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव
देण्यासाठी आपले बहुमोलाचे सहकार्य आवश्यक आहे. वरील नमूद करण्यात आलेल्या तारखांना
बैठकीस उपस्थित राहवे.हि विनंती आहे.
आपली विश्वासू ,
---सही--
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर
प्रत माहितीस्तव
सविनय सादर
१) मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा क्रीडा परिषद,मुंबई
उपनगर
२) मा. आयुक्त,क्रीडा व युवक सेवा म.रा.पुणे
३) मा.शिक्षणाधिकारी प्राथ./माध्य. मुंबई उपनगर जिल्हा
४) मा. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई उपनगर