जिल्हा क्रीडा पुरस्कार सन
२०२१-२२ मुंबई उपनगर जिल्हा.
जिल्हयातील गुणवंत क्रीडापटु आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे योगदानाचे मुल्यमापन होऊन
त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी
जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारामध्ये रोख रुपये १०,०००/-; प्रमाणपत्र
आणि सम्नानचिन्ह दिले जाते. या नुसार जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीने सर्वानुमते गुणांकनानुसार सन
२०२१-२२ साठी खालील खेळाडु आणि मार्गदर्शकांची निवड केली आहे. सदर पुरस्कार वितरण दि. ०१
मे २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण, बांद्रा, पुर्व येथे संपन्न होणार
आहे.
त्यानुसार सन २०२१ - २२ या वर्षांच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी ( गुणवंत खेळाडु पुरुष;
गुणवंत खेळाडु महिला आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक) खालीलप्रमाणे
आहेत.
अ.क्र. |
क्रीडा
पुरस्कारार्थीचे नाव व खेळ |
पुरस्काराचे
नाव |
१ |
अक्षय
प्रकाश तरळ - मल्लखांब |
गुणवंत
पुरुष खेळाडु |
२ |
रुपाली
सुनील गंगावणे – मल्लखांब |
गुणवंत
महिला खेळाडु |
३ |
अनिल
तुळशीराम थोरात – जिम्नॅस्टिक |
गुणवंत
क्रीडा मार्गदर्शक |