Thursday, March 26, 2026

मिशन लक्षवेध’ अंतर्गतक्रीडा निपुणता केंद्र

‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत
क्रीडा निपुणता केंद्र
निवड चाचणीसाठी ३ एप्रिलपर्यंत मुदत

मुंबई उपनगर : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत राज्यातील क्रीडा विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन लक्षवेध’ उपक्रमांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत. या केंद्रांमार्फत जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना ऑलिम्पिक स्तरावरील कामगिरीसाठी तयार केले जाणार असून, विविध खेळांच्या निवड चाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रामुख्याने अॅथलेटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, कुस्ती व बॉक्सिंग या पाच खेळांसाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जाणार आहेत. प्रत्येक खेळ प्रकारात २० खेळाडूंची निवड केली जाईल. निवड झालेल्या खेळाडूंना केवळ प्रशिक्षणच नाही, तर जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जातील.
न्यूट्रिशनिस्ट, पूरक आहार आणि भोजन सुविधा, क्रीडा साहित्य, गणवेश, वैद्यकीय चाचण्या व देश-विदेशातील प्रशिक्षणासाठी सहकार्य आदी सुविधांचा समावेश आहे.
इच्छुक खेळाडूंनी खालील लिंकवरून अर्ज सादर करावा:
👉 https://forms.gle/2f7yPkikdUBKNf7fA⁠�
निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रे व ३ फोटोसह उपस्थित राहावे.
संपर्क:
प्रीती टेमघरे – 9029250268
अभिजीत गुरव – 8108614911
— रश्मी आंबेडकर
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर

No comments:

Post a Comment