दि.११/०७/२०१७
वृत्तपत्रीय टिपणी
“अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या
होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबींसाठी आर्थिक सहाय्य करणे योजना प्रस्ताव
सदर करणे’’
राज्यात क्रीडा संकृतीची जोपासना व संवर्धन
परिनामकारन द्रुष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार
कामगिरी करून पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध
प्रशिक्षण,खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जदार पायाभूत सुविधा,खेळाडूंचा
गौरव,क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन क्रीडा
धोरण २०१२ तयार करण्यात आले आहे.या अंतर्गत राज्यातील खेळाडूंना अधिकृत
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील
खेळाडूंना आर्थिक सहाय्य देणे बाबतचा शासन निर्णय क्रमांक
:राक्रीधो-३११३/प्र.क्र.२९/क्रीयुसे-३/दि.२८ एप्रिल २०१४,अन्वये पारित झाला असून
हि योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित आहे.सदर शासन निर्णयातील अ.क्र.१ अन्वये
नमूद १४ अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या बाबींसाठी अर्थसहाय्य
अनुज्ञेय आहे.
i.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी
होण्यासाठीचा प्रवास खर्च,प्रवेश शुल्क,निवास,भोजन इ.
ii.
देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे,तंत्र क्रीडा प्रशिक्षकांचे
मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क.
iii. आधुनिक
क्रीडा साहित्य आयात /खरेदी करणे,गणवेश इ.
या योजनेसाठी पुढील स्पर्धा
अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे.
१)
ऑलिम्पिक गेम्स
|
६) एशियन चॅम्पियनशिप
|
११) पॅरा एशियन
स्पर्धा
|
२)
विश्व अजिंक्यपद स्पर्धा
|
७)युथ ऑलिम्पिक
|
१२) ज्यु. एशियन चॅम्पियनशिप
|
३)
एशियन गेम्स
|
८) ज्यु.विश्व अजिंक्यपद
स्पर्धा
|
१३)एशियन कप
|
४)
राष्ट्रकुल स्पर्धा
|
९)शालेय आशियाई/जागतिक
स्पर्धा
|
१४)वर्ल्ड कप
|
५)
राष्ट्रकुल युवा स्पर्धा
|
१०) पॅरा ऑलिम्पिक
स्पर्धा
|
|
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या खेळ /क्रीडा
प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ क्रीडा प्रकार वरील नमूद इतर स्पर्धांमध्ये आर्थिक
सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय होतील.मात्र अपवाद कबड्डी,खो-खो, मल्लखांब या देशी
खेळांचा अपवाद उपरोक्त शासन निर्णयान्वये करण्यात आलेला आहे.
उपरोक्त विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी
विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर या कार्यालयामार्फत किंवा आयुक्त,क्रीडा व युवक
सेवा,संचालनालय,महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळूंगे-बालेवाडी
,पुणे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती करिता आपले जिल्हा
क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांचे कार्यालय किंवा क्रीडा युवक सेवा
संचालनालय,महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळूंगे-बालेवाडी ,पुणे
येथील कार्यालयाशी संपर्क करावा.(दूरध्वनी संपर्क -०२०-२७३९०३७१ विस्तारित
क्र.२१४) dsomumbaisub.blogspot.com या संकेत स्थळावर अर्जाचा विहित नमुना आहे.
स्थळप्रत मा. आयुक्त
यांचे मान्यतेने
(श्रीमती
स्नेहल साळुंखे) जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment