*जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर व मुंबई किक बॉक्सिंग असोसिएशन (वाको मुंबई), मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा २०२४-२५*
*स्पर्धेसाठी वजन घेणे / तपासणी.*
*दिनांक १७ ऑक्टोबर २०२४(गुरुवारी)*
दुपारी १२:०० ते ०२:०० - १४ वर्षाखालील मुले आणि मुली.
दुपारी ०२:०० ते ०४:०० - १७ वर्षाखालील मुले आणि मुली.
दुपारी ०४:०० ते ०५:०० - १९ वर्षाखालील मुले आणि मुली.
*स्पर्धेचे दिवस, स्वरूप आणि आयोजन*:
*दिनांक - १८ ऑक्टोबर २०२४(शुक्रवार)*
वेळ - सकाळी १०:००
*१४ वर्षाखालील मुले आणि मुली स्पर्धा*
*दिनांक - १९ ऑक्टोबर २०२४(शनिवार)*
वेळ - सकाळी १०:००
*१७ वर्षाखालील मुले आणि मुली स्पर्धा*
*दिनांक - २० ऑक्टोबर २०२४(रविवार)*
वेळ - सकाळी १०:००
*१९ वर्षाखालील मुले आणि मुली स्पर्धा*
*स्थळ* - नित्यानंद मार्ग महानगर पालिका शाळा, सहार रोड, गरवारे प्लास्टिक जवळ, कोलडोंगरी, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००६९
*महत्त्वाची सूचना :*
*१) खेळाडूने वेळेनुसार उपस्थित राहावे आणी आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत ठेवावे.*
*२) तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.*
*३) खेळाडूंनी वैयक्तिक क्रीडा सामुग्री - किकबॉक्सिंग गणवेश(राऊंड नेक टी शर्ट आणि खिसा व झिप नसलेले ट्रॅक पँट), बॉक्सिंग ग्लोव्हज, हेड गार्ड, शिन पॅड, माउथ गार्ड, हॅण्ड रॅप, सेंटर गार्ड (मुलांसाठी) असणे आवश्यक आहे त्याशिवाय खेळाडूस खेळता येणार नाही.*
*४) आपले क्रीडा साहित्य,व मौल्यवान वस्तू स्वतः सांभाळाव्यात हरवल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.*
*५) पी. टी. शिक्षक व शाळेचे प्रतिनिधी यांनी शाळेचे ओळखपत्र अथवा प्रतिनिधी पत्र सोबत आणणे बंधनकारक आहे अन्यथा स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.*
*६) खेळाडू स्पर्धेच्या दिवशी वैद्यकीयदृष्ट्या स्वस्थ असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास तो खेळाडू खेळू शकणार नाही.*
*७) स्पर्धेच्या ठिकाणी फक्त खेळाडू , क्रीडा शिक्षक व स्पर्धा आयोजक समितीच्या सदस्यानांच प्रवेश राहील.*
*८) स्पर्धेच्या दिवशी व ठिकाणी नवीन वजन घेतली जाणार नाहीत.*
*९) पंचाचा आणि आयोजन समितीचा निर्णय अंतिम राहील. तसेच आयोजन समिती आणि पंच यांच्याशी कोणताही वाद कोणत्याही कारणास्तव घातल्यास तो संघ, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांच्यावर कडक शिस्तभंगाची कार्यवाही करून त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.*
*१०) स्पर्धेबाबत आवश्यक त्या सुचना www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.*
*स्पर्धा आयोजन प्रमुख*
श्री. विशाल सिंह सर - ७६६६५८४८५४
श्री. प्रशांत कांबळे सर - ७०४५१९४२५९
*स्पर्धा प्रमुख*
श्री. मार्क धर्माई सर - तालुका क्रीड़ा अधिकारी, अंधेरी ८८९८०९०९०७
No comments:
Post a Comment