भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वतंत्रता चळवळीमध्ये व तद-नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व सर्व स्तरातील जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस "राष्ट्रीत एकता दिवस " म्हणून साजरा कराण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून दिनांक ३१/१०/२०१५ रोजी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक ३१/१०/२०१५ रोजी भारतीय खॆळ प्राधिकरण कांदिवली या ठिकाणी एकता दौड चे आयोजन केलेले आहे . तरी जास्तीत जास्त लोकांनी सदर एकता दौड मध्ये सहभागी होण्यासाठी स. ०८:०० वा भारतीय खॆळ प्राधिकरण कांदिवली या ठिकाणी उपस्थितीत रहावे ही विनंती.
No comments:
Post a Comment