Wednesday, November 1, 2023

तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२३-२४

 

तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२३-२४

 

        तालुका आणि जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२३-२४ साठी प्राथमिक प्रवेशिका क्र.३ सुरु करण्यात आलेली आहे. ज्या शाळा कनिष्ठ शाळांच्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्या शाळा, कनिष्ठ महाविदयालयांनी प्राथमिक प्रवेशिका ०३ मध्ये प्रथम खेळाडूंचे पैसे भरुन त्यानंतर खेळाडूंचे प्लेअर आय डी अपलोड करावेत. तायक्वांदो खेळाच्या प्रथम तालुका स्पर्धा संपन्न होतील. त्यामुळे शाळा महाविदयालयांनी तालुकानिहाय प्रवेशिका भरावी.

                तायक्वांदो खेळाची प्राथमिक प्रवेशिका आणि प्लेअर आय डी भरण्याची मुदत आजपासुन दि. ०१/११/२०२३ पासुन सुरु झालेली असुन अंतिम दिनांक १०/११/२०२३  पर्यंत आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव प्लेअर आय डी अथवा पैसे भरण्यासाठी मुदतवाढ मागु नये.

            तसेच या खेळाची स्पर्धा १८ तारखेनंतर कधीही लागु शकणार आहे. जरी शाळांच्या दिवाळीच्या सुटट्या सुरु असतील तरी शिक्षकांनी व्हाटस ग्रुप आणि ब्लॉग यावर येणारी माहिती सहभागी खेळाडूंना विहीत वेळेमध्ये मिळेल याबाबत दक्षता घ्यावी. आपल्या शाळा – कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थांना आणि पालकांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ब्लॉगबाबत माहिती दयावी जेणेकरुन विदयार्थी आणि पालक यांनाही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित स्पर्धा आणि इतर सर्व कार्यक्रम यांची माहिती विहीत वेळेमध्ये मिळू शकेल.

              तसेच या खेळाबाबत ऑनलाईन सिस्टीममध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास दिशा मॅडम ७२०००९९१७४ आणि मनिष सर ७३०५९९२२८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

No comments:

Post a Comment