जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडे सन २०२३-२४ हया वर्षामधील ज्या विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती त्या स्पर्धांपैकी खालील खेळांची विभागस्तरावरील प्रमाणपत्रे या कार्यालयामध्ये तयार आहेत. विभागस्तरावरील प्रमाणपत्रे घेऊन जाण्यासाठी संबंधित शाळा / कनिष्ठ महाविदयालय यांनी क्रीडा शिक्षक / जबाबदार व्यक्ती यांना प्रमाणपत्र देण्याबाबतचे अधिकारपत्र देऊनच या कार्यालयामध्ये पाठवावे. शाळेच्या अधिकार पत्राशिवाय कोणत्याही कारणास्तव कोणालाही प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच विभागस्तरावरील प्रमाणपत्रे घेऊन जाण्यासाठी खेळाडू अथवा पालकांना पाठवू नये अशी विनंती आहे. तसेच सदर प्रमाणपत्रे ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०४.०० याच वेळेमध्ये घेऊन जावीत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२२ / २८८७११०५ यावर संपर्क साधावा. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा ब्लॉग www. dsomumbaisub. blogspot. com यावरही अधिक माहिती आणि सुचना उपलब्ध आहेत. सदर ब्लॉग नियमित पाहावा. तसेच उर्वरीत विभागस्तर खेळांची प्रमाणपत्रे तयार होताच त्याबाबतची माहिती देण्यात येईल.
विभागस्तर खेळाची तयार असणारी
प्रमाणपत्रे -: