मुंबई उपनगर जिल्हयातील प्राचार्य / मुख्याध्यापक / क्रीडा शिक्षक
यांना सूचित करण्यात येते की, सन २०२३ – २४ या वर्षीचे इयत्ता १० वी आणि १२ वी करिता क्रीडा गुण सवलत गुण प्रस्ताव
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाच्या
ब्लॉगवर आणि क्रीडा शिक्षकांच्या ग्रुपवर मॅसेज प्रसारित केल्या नंतरच परिपूर्ण संपूर्ण शाळेतील खेळाडूंचा एकत्रित प्रस्ताव शाळेच्या लेटर पॅड सोबत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयास शाळेमार्फत सादर करण्यात यावा.
याबाबत शाळेने खेळाडू / पालक यांचे मार्फत प्रस्ताव पाठविण्यात येऊ नये आणि कार्यालयामध्ये त्यांना पाठवु नये. क्रीडा गुण सवलत
प्रस्ताव सादर करण्याबाबत माध्यमिक शालांत परिक्षा बोर्ड आणि क्रीडा
संचालनालयाकडुन अदयाप कोणत्याही मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या नाहीत. सदर
सुचना प्राप्त झाल्यानंतरच क्रीडा गुण सवलत प्रस्तावाबाबतची कार्यवाही सुरु
करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच
इतर जिल्हयातील अथवा मागील वर्षातील समाज माध्यमावर प्रसारित क्रीडा गुण सवलतीच्या
संदेशाबाबत विनाकारण गैरसमज पसरवु नयेत. या कार्यालयाकडुन क्रीडा गुण सवलत
प्रस्तावाबाबत सविस्तर मार्गदर्शक सुचना आणि फॉर्म याची अधिकृत सुचना प्रसिध्द
झाल्यावरच कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर करावेत.
No comments:
Post a Comment