सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेतील खालील खेळांची प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी
तयार आहेत. तरी शाळा / कनि. महाविदयालयांनी या खेळांची प्रमाणपत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयातुन घेऊन जावीत. सदर प्रमाणपत्रे घेऊन जाण्यासाठी शाळेच्या जबाबदार व्यक्तीनेच घेऊन
जावीत. तसेच सदर प्रमाणपत्र कार्यालयातुन प्राप्त करुन घेण्यासाठी शाळेचे अधिकारपत्र संबंधित
व्यक्तीजवळ असणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत पालक अथवा खेळाडू यांना सदर
प्रमाणपत्रे स्वीकारण्यासाठी कार्यालयात पाठवु नयेत.
प्रत्येक
शनिवारी आणि रविवारी कार्यालयास सुट्टी असते याची कृपया नोंद घ्यावी.
जिल्हास्तर तयार खेळ प्रमाणपत्रे -:
१ . १. कॅरम २. नेट बॉल ३. हॉकी ४. बास्केटबॉल ५. थ्रोबॉल ६. क्रिकेट ७. मल्लखांब ८. (फेन्सिंग) तलवारबाजी
९. वॉटर पोलो १०. सेपक टकरा ११. ज्युदो १२. तायक्वांदो १३. लॉन टेनिस १४. टेनिक्वाईट १५. आट्यापाट्या
१६. व्हॉलीबॉल १७. रोलबॉल
१८. डॉजबॉल
विभागस्तर तयार खेळ प्रमाणपत्रे -:
१ १.
डॉजबॉल २. नेटबॉल ३. आटयापाटया ४. मल्लखांब
सदर प्रमाणपत्रे केवळ कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मिळतील. तसेच या कार्यालयाकडे काही राज्यस्तर खेळांची प्रमाणपत्रेही प्राप्त झालेली आहेत. त्याची
माहिती वेळोवेळी व्हाटस अप ग्रुप आणि ब्लॉगवर देण्यात आलेली आहे. सदर प्रमाणपत्रेही घेऊन जावीत.
कोणत्याही कारणास्तव शाळेच्या अधिकारपत्राशिवाय आणि शाळेच्या जबाबदार व्यक्तीशिवाय
इतर कोणत्याही व्यक्तींकडे प्रमाणपत्रे देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा www.dsomumbaisub.blogspot.com हा ब्लॉग नियमितपणे पाहावा.
No comments:
Post a Comment