Tuesday, August 19, 2025

क्रीडा शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची सुचना -

 क्रीडा शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची सुचना -

                    तालुकास्तर बास्केटबॉल, जिल्हास्तर क्रिकेट, डॉजबॉल, आटयापाटया, नेटबॉल, कॅरम, सेपक टकरा, रोलबॉल, ज्युदो, बॉक्सींग, टेनिक्वाईट, तलवारबाजी (फेन्सिंग) आणि मल्लखांब या खेळांच्या प्राथमिक प्रवेशिका अनेक शाळा कनिष्ठ महाविदयालयांनी भरल्याचे दिसुन येत आहे. तथापि, अनेक शाळा महाविदयालयांनी खेळाडु
ओळखपत्र भरुन अपलोड केल्याची (वैयक्तिक आणि सांघिक खेळासाठी) आढळुन येत नाही.

                  वरील खेळासाठी खेळाडु ओळखपत्र (प्लेअर आय डी) अपलोड करण्यासाठीची सुरुवात दि. ३१ जुलै २०२५ पासुन सुरु करण्यात आलेली आहेत. या खेळाचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम तारीख  त्या त्या खेळानुसार निश्चित केलेली आहे आणि याबाबत दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी व्हाटस ग्रुप, ब्लॉग आणि सिस्टीमवर माहिती दिलेली आहे. तथापि, अदयापही अनेक शाळा कनिष्ठ महाविदयालयांनी प्लेअर आय डी अपलोड केलेले नाहीत. यास्तव सर्वांना कळविण्यात येते की, वरील खेळासाठी प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी निश्चित केलेल्या तारखा हया अंतिम तारखा आहेत. त्यांनतर कोणत्याही कारणास्तव प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी मुदत वाढवुन देण्यात येणार नाही. आगामी काळात येणा-या सुटयांपुर्वीच प्लेअर आय डी अपलोड करण्याची कार्यवाही पुर्ण करण्यात यावी.

                 शालेय क्रीडा स्पर्धा सिस्टीमबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास श्री. प्रबोध राऊत ७३०५९९२२८२ आणि श्री. विकास मोहिते ७२०००९९२६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
      याशिवाय या जर विभाग आणि राज्यस्तर स्पर्धेच्या तारखा निश्चित झाल्यास या तारखा बदलण्याच्या अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास राहील याची स्पष्ट पणे नोंद घ्यावी.  यासाठी कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी. आगामी येणाऱ्या सुट्ट्या चा विचार करून प्लेअर आय डी अपलोड करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी विनंती सर्व क्रीडा शिक्षकांना आहे.

No comments:

Post a Comment