Tuesday, August 19, 2025

जिल्हास्तर शालेय कराटे, रग्बी, शूटिंग बॉल, जिम्नॅस्टिक, सिकई मार्शल आर्ट, वूशु, योगासन कुस्ती रोलर स्केटिंग, रोलर हॉकी, मैदानी २०२५ - २६ या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. (काही खेळांच्या सुधारित तारखा)

१) शूटिंग बॉल, रग्बी, सिकई मार्शल आर्ट, जिम्नॅस्टिक, कराटे-: दिनांक ३१ जुलै २०२५ ते ३१ऑगस्ट २०२५ (द्वितीय सुधारित तारीख)

२) योगासन -: दिनांक ३१ जुलै २०२५ ते १० सप्टेंबर २०२५ (सुधारित तारीख)

३) वूशु – दिनांक ३१ जुलै २०२५ ते ७ सप्टेंबर२०२५ (सुधारित तारीख)

४) रोलर स्केटिंग व रोलर हॉकी– दिनांक ३१ जुलै २०२५ ते २० सप्टेंबर २०२५ (सुधारित तारीख)

५) कुस्ती ३१जुलै२०२५ ते १० सप्टेंबर २०२५ (सुधारित तारीख )

त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

ऑनलाईन फॉर्म भरताना काही तांत्रिक असल्यास श्री. प्रबोध राऊत ७३०५९९२२८२ आणि श्री. विकास मोहिते ७२०००९९२६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment