सर्व क्रीडा शिक्षकांना महत्त्वाची सुचना.
सर्व क्रीडा शिक्षकांना महत्त्वाची सुचना आहे की, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणा-या सर्व शालेय क्रीडा स्पर्धांचे वाटप कार्यालयामधील अधिकारी आणि कर्मचारी यांना करण्यात आलेले आहे. त्याची खेळनिहाय यादी आणि त्यांचे संपर्क क्रमांकही त्यामध्ये दिलेले आहेत. त्या त्या खेळ वाटपाप्रमाणे त्या त्या अधिकारी कर्मचारी यांनी त्या त्या खेळाचे नियोजन निश्चित केले असेल किंवा त्याबाबत कार्यवाही सुरु असेल. त्यांनी त्या त्या खेळाच्या खेळाडु प्रवेशिका भरण्याच्या तारखाही निश्चित केलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या खेळाबाबत काही अडचण समस्या असल्यास कृपया संबंधित खेळ प्रमुखालाच फोन करावा, कारण दुस-या व्यक्तीला त्यांनी केलेले नियोजन इतरांना माहिती असण्याचे किंवा इतर त्याबाबत माहिती देऊ शकतीलच असेही नाही. त्यामुळे त्या त्या खेळ प्रमुखालाच फोन करुन माहिती घ्यावी. अनेकदा काही कारणास्तव त्यांचा फोन बिझी लागतो किंवा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतो अशा वेळी कृपया त्यांना तुमच्या समस्येबाबत व्हाटस अप मेसेज पाठवावा.
या शिवाय कार्यालयामधील अधिकारी कर्मचारी यांना केवळ साधा फोनच करावा. इंटरनेट कॉल करु नयेत. याशिवाय स्पर्धेच्या अनुषंगाने, खेळाडु भरण्याच्या बाबतीत देण्यात येणा-या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करावे. अनेक वेळा सांगुनही क्रीडा शिक्षक हे कार्यालयीन वेळेनंतर उशिरा फोन करतात, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे प्रवासात असतात किवा बाहेर असतात यास्तव आपणास सगळयांना कळविण्यात येते की कृपया सायंकाळी ७ नंतर तातडीची अडचण असल्यास केवळ व्हाटस अप मेसेज करावा. तसेच क्रीडा शिक्षक त्यांनी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक पालकांना अथवा खेळाडुंना देऊ नयेत.
शालेय क्रीडा स्पर्धा सिस्टीमबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास श्री. प्रबोध राऊत ७३०५९९२२८२ आणि श्री. विकास मोहिते ७२०००९९२६५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच अनेकदा सांगुनही ऑनलाईन सिस्टीम मध्ये पैसे भरताना एका पाठोपाठ एक पेमेंट करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. कृपया एकदा पेमेंट केल्यानंतर थोडा वेळ थांबुन त्याचा प्रतिसाद येईपर्यंत पुन्हा पेमेंट करु नये. याशिवाय स्पर्धेबाबतच्या सर्व सुचना हया शिक्षकांच्या व्हाटस ग्रुपवर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या ब्लॉगवरच www.mumbaisub.blogspot.com देण्यात येतात. त्यावर क्रीडा शिक्षकांनी दररोज नियमितपणे त्यावरील सुचनांची नोंद घ्यावी. तसेच या कार्यालयामार्फत देण्यात येणारे स्पर्धेच्या अनुषंगाने देण्यात येणारे सर्व संपर्क क्रमांक आपल्याकडे नोंदवुन ठेवावेत. तसेच ज्या ज्या तालुक्यामध्ये क्रीडा शिक्षकांना व्हाटस ग्रुप मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी श्रीमती तेजश्री पाटील ७५०६०९८७२२ याच क्रमांकावर संपर्क साधावा व एका शाळेमधील केवळ एअकाच क्रीडा शिक्षकांनी ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. शाळेने नियुक्त केलेल्या खाजगी क्रीडा मार्गदर्शक (कोच) यांचे मोबाईल क्रमांक ग्रुपवर नोंदवु नयेत.
No comments:
Post a Comment