Tuesday, October 18, 2022

शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ प्राथमिक प्रवेशिका - अत्यंत महत्वाची सुचना

 अत्यंत महत्वाची सुचना

सर्व शाळा महाविदयालयांना कळविण्यात येते की, सन २०२२-२३ हया वर्षासाठीच्या शालेय क्रीडा स्पर्धेसाठीची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांचेकडुन प्राथमिक प्रवेशिका दिनांक १७/१०/२०२२ पासुन सुरु करण्यात आलेली आहे. सदर प्रवेशिकेमध्ये नमुद केलेल्या खेळांमध्ये आप आपल्या शाळा महाविदयालयामधील खेळाडूंचा सहभाग निश्चित करण्यात यावा. सदर प्रवेशिकेमध्ये माहिती भरताना खेळाडूंची विहीत पध्दतीने निवड चाचणी आयोजित करुन अथवा खेळाडूंना विचारुन त्यांचा खेळ प्रकार व त्याचा उपप्रकार, वयोगट, वजनगट, इयत्ता, जन्मतारीख आणि खेळाडुचे आणि शाळेचे मराठी नाव हे काळजीपुर्वक भरावे. एकदा माहिती भरल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याची स्पष्टपणे सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच सदर प्राथमिक प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख ही ०५/११/२०२२ ही आहे याचीही सर्वांनी नोंद घ्यावी. स्पर्धेसाठी खेळ प्रकार निहाय फी (पेमेंट गेट वे) अदयाप सुरु झाले नाही. एक दोन दिवसात पेमेंट गेट वे सुरु होईल. पेमेंट गेट वे सुरु झाल्यावर याबाबत आपणास कळविण्यात येईल. 

फी चा तक्ता खालीलप्रमाणे आहे.

फी बाबत :- नोंदणी शुल्क व प्रवेश फ़ी विद्यार्थी संख्येनुसार प्राथमिक /माध्यमिक शाळा व कनिष्ठ     

     महाविद्यालयांनी भरावयाचे शुल्क खालीलप्रमाणे आहे.

अ.नु

विद्यार्थी संख्या

भरावयाचे संलग्नता शुल्क (रुपये)

क्रिडा निधी (रुपये)

1.

1 ते 500

100/-

250/-/-

2.

501 ते 1000

150/-

450/-

3.

1001 ते 1500

200/-

550/-

4.

1501 ते 2000

250/-

600/-

5.

2001 ते 2500

300/-

750/-

6.

2500 पेक्षा जास्त विद्यार्थी

350/-

1000/-

 

प्रत्येक संघांसाठी प्रति संघ रु. 100/- व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील प्रति बाब रू. 50/- तसेच खालील काही विशेष खेळबाबींसाठी पुढील प्रमाणे फी आकारण्यात येईल.

 1. क्रिकेट - रू. 400/-     2. फुटबॉल (सर्व) - रू.400/-  3. बॅडमिंटन - रू. 200/-     4. हॉकी (सर्व) - रू.400/-   5. लॉन टेनिस (प्रति खेळाडू) - रू. 100/-  6. बास्केटबॉल (प्रति संघ)- रू.200/- 7. रायफल शुटींग (नेमबाजी) (प्रति खेळाडू) - रू.100/-             8. टॆबल टॆनिस (प्रति संघ)- रू.150/-

Tuesday, October 11, 2022

अंधेरी तालुका सभा तारीख बदलाबाबत - महत्त्वाचे

                                                                         अंधेरी तालुका सभा 

                                                             

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आयोजित तालुका तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेचे नियोजन करणे साठी अंधेरी तालुका क्रीडा शिक्षकांची सभा दि. १२/१०/२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे होती. तथापि, काही तांत्रिक अडचणीमुळे सदर बैठक ही दिनांक १३/१०/२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. कृपया या बदलाची सर्वांनी नोंद घ्यावी. बैठकीचे ठिकाण तेच आहे.

स्थळ - चिल्ड्रेन वेल्फेअर हायस्कूल, यारी रोड, अपो. न्यु इंडिया बँक , यारी रोडचा शेवटचा बस स्टॉप, वर्सोवा, मुंबई ४०००६१

. सभेमध्ये सॉफ्टवेअर प्रशिक्षण व इतर महत्वाच्या सूचना देण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक शाळा व महाविद्यालये यांनी एक क्रीडाशिक्षक पाठवून सहकार्य करावे. येताना शाळेचा udias no घेऊन यावा.जे शाळा / महाविद्यालय एखाद्या खेळाचे आयोजनात इच्छुक आहेत त्यांनी त्याबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयात लेखी पत्र देऊन अवगत करावे.तसेच सदर ऑनलाईन बैठक व ट्रेनिंग हे एकदाच होईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशी विनंती आहे.

Friday, October 7, 2022

                                                              बोरीवली तालुका सभा 


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आयोजित तालुका तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेचे नियोजन करणे साठी बोरिवली तालुका क्रीडा शिक्षकांची सभा दि. ११/१०/२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

स्थळ - चिल्ड्रेन वेल्फेअर हायस्कूल, मालाड. 

सभेमध्ये सॉफ्टवेअर प्रशिक्षण व इतर महत्वाच्या सूचना देण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक शाळा व महाविद्यालये यांनी एक क्रीडाशिक्षक पाठवून सहकार्य करावे. येताना शाळेचा udias no घेऊन यावा.जे शाळा / महाविद्यालय एखाद्या खेळाचे आयोजनात इच्छुक आहेत त्यांनी त्याबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयात लेखी पत्र देऊन अवगत करावे. तसेच सदर ऑनलाईन बैठक व ट्रेनिंग हे एकदाच होईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशी विनंती आहे.

                                                                   अंधेरी तालुका सभा 

                                                             

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आयोजित तालुका तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेचे नियोजन करणे साठी अंधेरी तालुका क्रीडा शिक्षकांची सभा दि. १२/१०/२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

स्थळ - चिल्ड्रेन वेल्फेअर हायस्कूल, यारी रोड, वर्सोवा. 

सभेमध्ये सॉफ्टवेअर प्रशिक्षण व इतर महत्वाच्या सूचना देण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक शाळा व महाविद्यालये यांनी एक क्रीडाशिक्षक पाठवून सहकार्य करावे. येताना शाळेचा udias no घेऊन यावा.जे शाळा / महाविद्यालय एखाद्या खेळाचे आयोजनात इच्छुक आहेत त्यांनी त्याबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयात लेखी पत्र देऊन अवगत करावे.तसेच सदर ऑनलाईन बैठक व ट्रेनिंग हे एकदाच होईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशी विनंती आहे.

                                                                       कुर्ला तालुका सभा


 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , मुंबई उपनगर आयोजित कुर्ला तालुका व जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन  व ऑनलाईन प्रशिक्षण  सभा २०२२-२३

दिनांक - १०/१०/२०२२.   

 वेळ - सकाळी :१०:३० वा उपस्थिती 

स्थळ - सह्याद्री विद्यामंदिर , शिवाजी तलाव जवळ , भांडुप (प.) मुंबई -७८*

सभेमध्ये सॉफ्टवेअर प्रशिक्षण व इतर महत्वाच्या सूचना देण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक शाळा व महाविद्यालये यांनी एक शिक्षक पाठवून सहकार्य करावे. येताना शाळेचा udias no घेऊन यावा.

तसेच सदर ऑनलाईन बैठक व ट्रेनिंग हे एकदाच होईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशी विनंती आहे.

                                                                      

                                                                 

Wednesday, September 7, 2022

केंद्र शासनाचे क्रीडा पुरस्कार २०२२

 

अत्यंत महत्त्वाचे


       मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विदयापीठांकरिता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन  अर्वार्ड, २०२२ करिता नामांकनाकरिता नामनिर्देशन प्रस्ताव दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्रशासनास सादर करण्याबाबत सुचित केलेले आहे. तसेच विहीत कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपुर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही असे नमुद केलेले आहे.  तसेच या वर्षीपासुन पात्र खेळाडुंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारेच आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची / अथवा व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर / वेबसाईटवर सादर करावे, असेही सुचित केलेले आहे. तसेच ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण असल्यास Departmental of Sports at section.sp4-moyas@gov.in किंवा ०११-२३३८७४३२ या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी ०९.०० ते सायं. ०५.३० पर्यंत संपर्क करावा. तसेच केंद्र शासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती, नियमावली व विहीत नमुना अर्ज http://yas.nic.in/sports या बेवसाईइटवर उपलब्ध आहेत.

Monday, August 8, 2022

JAWAHARLAL NEHRU HOCKEY 2022-23 -: DRAWS

 PLEASE SEE THE ALL AGR GROUP DRAWS OF JAWAHRLAL NEHRU DISTRICT HOCKEY TOURNAMENT 2022-23.





Wednesday, August 3, 2022

ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी स्पर्धा २०२२



 

ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी स्पर्धा २०२२ या स्पर्धेची प्रवेशिका विहीत नमुन्यात dsomumbaisub2020@gmail.com या मेल वर दि. ०८/०८/२०२२ दुपारी ०१.०० पर्यंत पाठवाव्यात. तसेच हार्ड कॉपी व प्रवेश फी  रु. ४००/- प्रति संघ खालील दिलेल्या माहीतीच्या आधारे बँक खात्यामध्ये जमा करुन त्याची काउंटर स्लीप किंवा Transection  number (मोबाईल मधुन Transection केल्यास  screen shot  काढुन  त्याची प्रत) प्रवेशिकेसोबत या कार्यालयात जमा करावी .

 Bank name -: Axis Bank

Account Name -: Zilha krida parishad, Mumbai Upnagar  

Account number -: 917020041203249

IFS code -: UTIB0000572





 

Monday, August 1, 2022

DISTRICT SPORTS AWARD-: APPLICATION FOR OF PLAYER (MALE/FEMALE/HANDICAP PLAYER FORM)

 DISTRICT SPORTS AWARD-: APPLICATION FOR OF PLAYER (MALE/FEMALE/HANDICAP PLAYER FORM)















DISTRICT SPORTS AWARD 2021-22 -: APPLICATION FORM OF COACH

DISTRICT SPORTS AWARD- APPLICATION FORM OF COACH.











 

DISTRICT SPORTS AWARD 2021-22

 

जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचे आवाहान.

            क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांचेद्वारा दिनांक २४/०१/२०२० रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सन २०२१ - २२ या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्हयातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडु) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गर्शक  यांच्या कार्याचे / योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२१-२२ या वर्षाकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडु) आणि क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

(अ) क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार -: (१) पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्हयामध्ये वास्तव्य असावे. (२) वयाची ३५ वर्ष पुर्ण केलेली असावीत. (३) सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्हयातील कामगिरी ग्राहय धरली जाईल. (४) गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडु तयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.

(ब) खेळाडु पुरस्कार -: (१) खेळाडुने पुरस्कार वर्षासह लगत पुर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या जिल्हयाचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. (२) खेळाडुंची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य / राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षालगतपुर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीयस्तरावरील वरीष्ठ /कनिष्ठ शालेय, राष्ट्रीय शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी आणि यापैकी उत्कृष्ठ तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.  

       वरील प्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविदयालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व) मुंबई ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२२/ २८८७११०५ यावर संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी कळवले आहे.





 

Tuesday, July 26, 2022

Subroto Mukharjee football all age group 3rd place & finals

 





Friday, July 22, 2022

Subroto Mukharjee football U/17 Boys Semi finals

 

 





Please note that all age group 3rd place & finals will be held on 27th July 2022 at 
St. Fransis de asisi high school, Borivali. 


Sunday, July 17, 2022

Subroto Mukharjee football U / 17 Boys draw

 

Please note that next rounds matches of Under 17 years boys on 22/07/2022 placed in St fransis de asisi high school, borivali.  also  all the next round matches will be playing on St. fransis de asisi high school, borivali. 




































































Saturday, July 16, 2022

U/14 Boys & U/17 Girls Draw

 




Thursday, July 14, 2022

Subroto Mukharjee football U / 17 Girls draw