Tuesday, August 6, 2019

"युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही " राज्यामध्ये युवा संसद या कार्यक्रमाचे अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा व युवा संसद आयोजन करणेबाबत

Maharashtra State Symbol साठी प्रतिमा परिणाम
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन
וֻÆüÖ ÛÎúß›üÖ †×¬ÖÛúÖ¸üß कार्यालय, ´ÖãÓ²Ö‡Ô ˆ¯Ö®ÖÝÖ¸ü
शासकीय शारीरिक शिक्षण महाविदयालय परीसर, संभाजीनगर,आकुर्ली रोड, कांदिवली,पूर्व,मुंबई 400101.
¤ãü¸ü¬¾Ö®Öß ÛÎú. 28871105                         E Mail-dsomumbaisub@gmail.com


क्र.क्रीअमुंऊ/युवककल्याण/युवासांसद/2019/520,                                दि.

प्रति,
प्राचार्य / मुख्याध्यापक,
सर्व कनिष्ठ महाविद्यालये, मुंबई उपनगर जिल्हा


         विषय - "युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही " राज्यामध्ये युवा संसद या  
                     कार्यक्रमाचे अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा व युवा संसद आयोजन करणेबाबत

          संदर्भ -1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शा.नि.क्र.युकयो.2019/प्रक्र.211/
                          क्रीयुसे-3, दि.24.7.2019
                     2. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे दि.25.7.5019 चे पत्र


राज्यामध्ये युवा संसद या कार्यक्रमाचे आयोजन सन 2019-20 या वर्षात करण्यासाठी संदर्भांकीत शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालय स्तर,तालुका/ गटस्तरावर वक्तृत्व स्पर्धा तसेच जिल्हा व राज्यस्तर युवा संसद आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमांचे आयोजन शासन निर्देशानुसार करताना खालील सुचनांचे पालन करण्यात यावे.
·         " युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही " राज्यामध्ये युवा संसद या कार्यक्रमाचे अंतर्गत संदर्भांकीत शासन निर्णय दि. 24.7.2019 मधिल सुचनांचे पालन करण्यात यावे.
·         खालील प्रमाणे कार्यक्रमांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यानुसार कार्यक्रम विहीत मुदतीत संपन्न करावेत.
अ.क्र.
स्तर
कालावधी
मुंबई उपनगर जिल्हा आयोजन दिनांक
१.
कॉलेज स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा
दि.10 ते 15 ऑगस्ट  २०१९
 नंतर कळविण्यात
येईल.
२.
गटस्तरावरील वक्तृत्व स्पर्धा
दि.16 ते 20 ऑगस्ट २०१९
३.
जिल्हास्तर युवा संसद
दि.21 ते 26 ऑगस्ट २०१९
४.
राज्यस्तर युवा संसद
दि.28 ते 31 ऑगस्ट २०१९


·          या उपक्रमात 15 ते 19 या वयोगटातील कनिष्ठ महाविद्यालयातील युवा सहभागी होतील.
·         वक्तृत्व स्पर्धा व संसदेसाठी प्रमुख भाषा माध्यम मराठी हे राहील. तसेच इंग्रजी, हिंदी व उर्दू या भाषा माध्यमातून भाषण करण्याची मुभा राहील.
·         कार्यक्रम आयोजन समिती खालील प्रमाणे राहील. सदर समितीने याबाबत नियोजन करण्यात यावे .
Ø  कॉलेज व गटस्तर आयोजन  -  गटशिक्षणाधिकारी - अध्यक्ष, इतर 6 सदस्य
Ø  जिल्हास्तर आयोजन - शिक्षणाधिकारी माध्यमिक - अध्यक्ष, जिल्हा क्रीडा अधिकारी - सदस्य सचिव व इतर 5 सदस्य



·         कनिष्ठ महाविद्यालयस्तर व गटस्तरावरील वक्तृत्व स्पर्धा तसेच  जिल्हा व राज्यस्तरावर युवा संसदेचे आयोजन अशा स्वरुपाचे आहे. केद्र व राज्य शासनाच्या खालील शासकीय योजनांवर युवांना  विचार मांडण्यात विषय निश्चित करण्यात आलेले आहेत.

1.प्रधानमंत्री जनधन योजना,
2.स्वच्छ भारत अभियान,
3.निर्मलग्राम अभियान,
4.श्रमदान
5. प्रधानमंत्री उज्वला योजना ,
6. आयुष्यमान भारत
7.सर्वांसाठी घरे                       
8.सेवा हमी कायदा,
9. मुद्रा योजना,
10.पिक विमा योजना,
11. मुख्यमंत्री/प्रधानमंत्री सडक योजना,
12.जलयुक्त शिवार अभियान,
13. कौशल्य विकास कार्यक्रम,
14. सुप्रशासन,
15.भारताची चंद्रयान मोहीम

·         राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रथम फेरी मध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात यावी. प्रथम तीन क्रमांकाचे युवा पुढील गटस्तरावर साठी निवडण्यात यावेत. कॉलेज स्तरावर किमान 30 ते 50 युवांचा सहभाग होतील असे पहावे.
·         कनिष्ठ महाविद्यालयांच्या ७ ते 20 कॉलेजचा 1 गट याप्रमाणे गटस्तरावर वक्तृत्व स्पर्धेची दुसरी फेरी आयोजित करण्यात येईल. गट करण्याचा अधिकारी जिल्हास्तर समितीला राहील.
·         गट स्पर्धेमधून प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ठ 3 युवा जिल्हास्तरील युवा संसदेसाठी निवड करण्यात येईल.
·         गट ठिकाणी 60 युवा एकत्रित येतील यासाठी पुरेशी व्यवस्था असावी. हॉल, माईक व्यवस्था, आसनव्यवस्था, विचारात घेवून स्थळ निश्चित करण्यात यावे.
·         गुणांकन व परिक्षक - केंद्र व राज्य शासनाच्या वरील योजनांबाबत युवक/युवतीकडून मांडण्यात आलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने खालील प्रमाणे गुणांकन करण्यात यावे. 
अक्र
बाब
गुण
1.
विषयाचे सखोल ज्ञान
20
2.
मुद्दे मांडणी
20
3.
वक्तृत्व कला
20
4.
सादरीकरण
20
5.
प्रभाव
20

एकूण गुण
100

·         कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर छात्र युवा संसदेमधील उत्कृष्ट युवकांची निवड करण्यासाठी कनिष्ठ/वरीष्ठ महाविद्यालयातील विषयतज्ञ/प्राध्यापक/सेवानिवृत्त प्राध्यापक यांची परीक्षक म्हणून 3 सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी.






·         गट शिक्षणाधिकारी यांची गट स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी राहील. गटस्तरावर 3 परिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.तालुक्यामधिल कनिष्ठ महाविद्यालयातील विषयतज्ञ शिक्षक/ प्राध्यापक यांची परिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावी.
·         जिल्हास्तरावर 3  सदस्यांची निवड समिती परिक्षक म्हणून राहील.यामध्ये लेखक,शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी इत्यादी  समावेश असावा.
                               कनिष्ठ महाविद्यालय स्तर - प्रथम फेरी
·         प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे.
·         निश्चित केलेल्या विषयांवर विचार मांडण्यासाठी 4 ते 5 मिनिटे वेळ देण्यात यावा.
·         कॉलेज स्तरावर वक्तृत्व स्पर्धेमध्ये किमान  30 ते 50 युवांचा सहभाग असणे आवश्यक आहे. यामधून प्रथम, व्दितीय व तृतीय असे 3 क्रमांकाचे स्पर्धक पुढील गटस्तरावर पाठविण्यात यावे.
·         स्थानिक स्तरावर सहकार्य घेऊन / प्रायोजक यांच्या सहकार्याने  वक्तृत्व स्पर्धा पार पाडावी.
·         कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सहभागी होणा-या युवांचा डाटाबेस तयार करणेसाठी नाव, इयत्ता, संपर्क क्रमांक, ई मेल इ. माहिती संकलित करण्यात यावी.
·         कार्यक्रमात सहभागी होणा-या युवांना सहभागाचे तसेच प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात यावे.

गटस्तर -

·           तालुका/गट स्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. विषयावर विचार मांडण्यासाठी 4 ते 5 मिनिटे वेळ राहील.
·            ज्या तालुक्यात कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या जास्त आहे. त्या तालुक्यात 20 कॉलेजचा एक गट याप्रमाणे ( 60 स्पर्धकांचा एक गट )  वक्तृत्व स्पर्धा घेण्यात यावी. यामधून 3 स्पर्धक जिल्हास्तरावर पाठविण्यात यावे.
·           गटस्तरावर युवांना सहभाग प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देण्यात येईल.
·           गटस्तरावर सर्वोत्कृष्ट तीन युवांना अनुक्रमे रु.3,000/-, रु. 2,000/-, रु.1.000/- याप्रमाणे बक्षिस रक्कम देण्यात येईल.

·         तालुकास्तरीय आयोजन समिती - गटशिक्षणाधिकारी - अध्यक्ष,  प्राचार्य - (दोन  प्रतिनिधि)- सदस्य, युवा विद्यार्थी प्रतिनिधि 1 युवक व 1 युवती- सदस्य, तालुका क्रीडा अधिकारी - सदस्य सचिव, आयोजन अनुषंगाने  निमंत्रित सदस्य आमंत्रित करण्याचा अधिकार समिती अध्यक्षांना राहील.
·         तालुकास्तरीय आयोजन समितीने कनिष्ठ महाविद्यालय स्तर, गटस्तर इत्यादी ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी राहील. गट स्तरावर 3 परिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. महाविद्यालयातील विषयतज्ञ शिक्षकांना परिक्षक म्हणून जबाबदारी सोपवावी.

जिल्हास्तर तृतीय फेरी -
·         जिल्हास्तरावर एक दिवसाची जिल्हा छात्र-युवा संसद आयोजित करण्यात यावी.
·         6 ते 7 तास युवा संसद सकाळ व दुपार सत्र अशा दोन सत्रात घेण्यात यावी.
·         गट स्तरा
·         वरील प्रथम तीन क्रमांकाचे युवा हे जिल्हास्तरावर सहभागी होतील.

·         जिल्हास्तरावर सहभागी होणा-या युवांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्वोत्कृष्ट तीन युवांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देवून गौरविण्यात यावे.
·         जिल्हास्तरावर 3 सदस्यांची निवड समिती राहील.यामध्ये लेखक,शिक्षण क्षेत्रातील कनिष्ठ/ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक/सेवा निवृत्त प्राध्यापक, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी इत्यादी  समावेश असावा.
·         जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ठ तीन युवांना अनुक्रमे प्रथम रु.10,000/-, व्दितीय- रु. 7000/-, तृतीय - रु.5000/- या प्रमाणे बक्षिस रक्कम देण्यात येईल.


· जिल्ह्यास्तरावरुन  प्रथम तीन क्रमांकाचे युवा व एक व्यवस्थापक राज्यस्तरावर पाठविण्यात येतील. 
अ.क्र.
नाव
पदनाम
१.
शिक्षणाधिकारी , (माध्यमिक )
अध्यक्ष
२.
समन्वयक नेहरु युवा केंद्र
सदस्य
३.
युवा कल्याणकारी कार्य करणा-या संस्था प्रतिनिधी एक
सदस्य
४.
राष्ट्रीय/राज्य/जिल्हा युवा पुरस्कारार्थी एक प्रतिनिधी
सदस्य
5.
मुख्याध्यापक / प्राचार्य दोन प्रतिनिधी
सदस्य
6.
जिल्हा क्रीडा अधिकारी
सदस्य सचिव
·         जिल्हास्तरावर युवा संसद आयोजनासाठी खालीलप्रमाणे समिती राहील.


                       राज्यस्तरीय युवा संसदेचे आयोजनाचे स्वरुप
·         36 जिल्हयातून प्रत्येकी प्रथम,व्दितीय,तृतीय, क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांचा राज्यस्तरीय युवा संसदेत सहभाग राहील.
·         राज्यस्तरीय युवा संसदेची रुपरेषा ही युवा संसद व युवा संमेलन या स्वरुपाची राहील.
·         राज्यस्तरीय युवा संसद आयोजित होणा-या स्थानिक शहरातील १००० युवक व युवती यांना युवा संमेलनासाठी आमंत्रित करण्यात यावे.


कार्यक्रमाची दैनंदिन रुपरेषा -

·         युवा संसदेसाठी सहभागी होणा-या सदस्या मधून युवा संसद अध्यक्ष, युवा मंत्री मंडळाची निवड करण्यात यावी तसेच  विरोधी पक्षनेता व इतर संसद सदस्य राहतील.
·         युवा संसदेचे सर्व कामकाज, कार्यवाही व नोंदी ठेवण्यासाठी ८ ते 12 अभ्यासू युवकांचे सचिवालयाची निवड करण्यात यावी.
·         युवा संसदेमध्ये चर्चा ही निश्चित केलेल्या शासकीय योजनांच्या अनुषंगाने असावी.
·         युवा संसदेमध्ये सामाजिक हिताचे विषय चर्चिले जाण्यासाठी नविन विषय युवा संसदेच्या सदस्यांना अध्यक्षा वेळ निश्चित करून देतील त्यावेळेत सुचविता येतील. युवा संसदेमध्ये स्थानिक स्तरावरील विकासाच्या बाबीं, अडीअडचणी यावर चर्चा करण्यात यावी.
·         सत्र १ - युवा संसद ही प्रथम सत्र व द्वितीय सत्र असे मिळून 6 ते ७ तासापेक्षा जास्त असावे.
·         सत्राच्या सुरवातीला युवा संसदेचे अध्यक्ष सर्व सदस्यांना व सभागृहास युवा संसदेच्या कामकाजाचे मार्गदर्शन करतील. सदस्यांचा सामुहिक शपथविधी घेण्यात यावा, तसेच प्रत्येक संसद सदस्यांना बोलणेसाठी किमान ३ मिनिटे कालावधी निश्चीत करावा. तसेच चर्चेला संबंधित मंत्रीगण उत्तर देणेसाठी वेळ देण्यात यावा.
·         सत्र २ - संसद अध्यक्षांच्या परवानगीने प्रश्नोत्तरे निश्चित करुन क्रमाने सभा अध्यक्षांपुढे ठेवण्यात यावे.

·         सदस्यांकडून महत्वाचे प्रश्न घेण्यात यावेत व त्याचा प्राधान्यक्रम ठरवून अध्यक्षाने चर्चिले जाणा-या प्रश्न निश्चीत करावे.
·         प्रत्येक विभागाने आपले ठराव पारित करण्यासाठी प्रस्तावाची मांडणी करावी व प्रस्ताव मंजूर करुन घ्यावा.
·         जिल्हा युवा संसदेमधून स्तरावरुन 3 युवा व 1 संघव्यवस्थापक यांची निवड राज्य कार्यक्रमासाठी करण्यात येईल .
·         सदर कार्यक्रमाची विस्तुत प्रसिध्दी करुन युवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.
·         कार्यक्रम रुपरेषा परिशिष्ट अ नुसार जोडली आहे.
·         युवा संसदेमध्ये विशेष अतिथी म्हणून मा.मंत्री,मा.पालकमंत्री,मा.खासदार/आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी व तज्ञ यांना आमंत्रित करण्यात यावे.
·         युवा संसदेमध्ये सहभागी होणा-या युवांना जास्तीत जास्त चर्चेसाठी वेळ मिळणेसाठी   उदघाटन कार्यक्रम अल्प वेळेमध्ये संपन्न करावा.
·         सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात अहवाल सादर करावा.
·         सोबत परिशिष्ट अ नुसार संबधित महाविदयालयांनी आपली प्रवेशिका तालुकानिहाय सोबत च्या नमुना प्रवेशिकेत नमुद ई मेलवर माहिती पाठविण्यात यावी. आणि मुळ प्रवेशिका स्पर्धा ठीकाणी सादर करावी.अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2019  राहील.


                 वरील सुचनांचे पालन करुन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल व फोटो पाठविण्यात यावेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर
शिक्षणाधिकारी ( माध्यमिक)
मुंबई उपनगर























परिशिष्ट अ

·         जिल्हास्तर छात्र युवा संसद आयोजन कार्यक्रम पत्रिका रुपरेषा खालील प्रमाणे असावी .


वेळ
बाब
सकाळ सत्र
09.00 ते 10.00 वा.
युवांची कार्यक्रम स्थळी उपस्थिती व आल्पोपहार
10.00 ते 11.00 वा
छात्र युवा संसद उद्घाटन समारंभ व मान्यवरांचे मार्गदर्शन
11.00 ते 11.15 वा
चहापान

11.15 ते 1.30 वा.
युवा संसदेसाठी सहभागी होणा-या सदस्या मधून  संसद अध्यक्ष, युवा मंत्री मंडळ व  विरोधी पक्षनेता निवड करणे तसेच इतर संसद सदस्य राहतील.
·         सत्राच्या सुरवातीला युवा संसदेचे अध्यक्ष सर्व सदस्यांना व सभागृहास युवा संसदेच्या कामकाजाचे मार्गदर्शन करतील.
·         सदस्यांचा सामुहिक शपथविधी ,
·         सदस्यांना बोलणेसाठी किमान ३ मिनिटे कालावधी देण्यात यावा,
·         चर्चेला संबंधित मंत्रीगण उत्तर
शासकीय योजना, स्थानिक स्तरावरील विकासाच्या बाबीं,अडचणी व उपायययोजना इ.च्या अनुषंगाने युवा संसदेमध्ये चर्चा
1.30 ते 2.00 वा.
दुपारचे जेवण

दुपार सत्र
2.00 ते 3.00 वा.
प्रश्नोत्तरे व ठराव
·         संसद अध्यक्षांच्या परवानगीने प्रश्नोत्तरे निश्चित करुन क्रमाने सभा अध्यक्षां पुढे ठेवणे ,
·         सदस्यांकडून महत्वाचे प्रश्न घेणे  त्याचा प्राधान्यक्रम ठरविणे,  अध्यक्षांनी चर्चिले जाणारे प्रश्न निश्चीत करणे
·         विभागाने ठराव पारित करण्यासाठी प्रस्तावाची मांडणी व प्रस्ताव मंजूरी
3.00 ते 4.00 वा.
समारोप
·         युवा संसदेची फलनिष्पत्ती ,  अहवाल तयार करणे  व समारोप











युवा जागर - महाराष्ट्रावर बोलू काही

युवा छात्र संसद आयोजन
प्रवेश अर्ज नमुना
महाविद्यालयाचे नाव     --------------------------------------------
पत्ता                              --------------------------------------------
ई मेल                           --------------------------------------------
संपर्क क्रमांक                --------------------------------------------

अक्र
नाव
जन्म दिनांक
रजिस्टर क्रमांक
इयत्ता
मोबाईल क्र.







































































































दिनांक -
प्राचार्य
स्वाक्षरी
                                      ...


·         टिप - प्रवेश अर्ज तालुका कुर्ला/अंधेरी/बोरीवली या तालुक्याच्या तालुका क्रीडा अधिकारी यांचे ई मेलवर जमा करावेत. तसेच प्रत्यक्ष स्पर्धाठीकाणी मुळ अर्ज जमा करावा.
·         कुर्ला - tsokurla@gmail.com
·         अंधेरी - tsoandheri57@gmail.com
·         बोरीवली - tsoborivali@gmail.com
·         मुंबई उपनगर जिल्हास्तरासाठी -  dsomumbaisub@gmail.com
                                               --

                            युवा जागर - महाराष्ट्रावर बोलू काही
                          युवा छात्र संसद आयोजन
                             कॉलेजस्तर अहवाल

अक्र
बाब
१.
जिल्हांचे नाव


2.
कॉलेजस्तर


वक्तृत्व स्पर्धा सहभागी युवा संख्या


3.
कॉलेजस्तर आयोजन कालावधि
दि. 

4.
गटस्तरावर निवड झालेल्या युवांची माहीती


1.     नाव


2.     जन्म दिनांक


3.     कॉलेजचे नाव


4.     जनरल रजिस्टर क्रमांक



·         कॉलेज युवा संसद वक्तृत्व स्पर्धा  सविस्तर अहवाल सादर करावा.
·         फोटो , वृत्तपत्र कात्रण इ सोबत जोडावे.

                                ....






















                            युवा जागर - महाराष्ट्रावर बोलू काही
                          युवा छात्र संसद आयोजन
                                अहवाल

अक्र
बाब
१.
जिल्हांचे नाव


2.
कॉलेजस्तर


सहभागी कॉलेजची
संख्या


वक्तृत्व स्पर्धा
सहभागी युवा संख्या


3.
कॉलेजस्तर आयोजन कालावधि
दि. 

४.
गटस्तर वक्तृत्व स्पर्धा
आयोजन


ठिकाण
कालावधि
सहभागी संख्या
1.


2.


3.


4.


5.



एकूण


5.
जिल्हास्तर छात्र युवा संसद


ठिकाण


दिनांक


सहभागी युवा संख्या


6.
राज्यस्तर निवड झालेल्या युवांची माहीती


5.     नाव


6.     जन्म दिनांक


7.     कॉलेजचे नाव


8.     जनरल रजिस्टर क्रमांक



·         कॉलेज,गट व जिल्हा युवा संसद वक्तृत्व स्पर्धा व जिल्हा संसदेचा सविस्तर अहवाल सादर करावा.
·         निधि शिल्लक राहील्यास शासनास चलनाने परत करावा.
·         फोटो , वृत्तपत्र कात्रण इ सोबत जोडावे.

                                ....


No comments:

Post a Comment