Wednesday, October 15, 2025

शालेय क्रीडा स्पर्धा सूचना

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या द्वारे शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत वेळोवेळी शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचना आणि आदेश याची माहिती व्हाट्सअप ग्रुप, ब्लॉग आणि क्रीडा शिक्षकांच्या बैठकीमध्ये देण्यात येतात. त्यानुसार स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करूनच त्या त्या खेळात भाग घेणे ही शाळा / कनिष्ठ महाविद्यालय आणि खेळाडू यांचीच सर्वस्वी जबाबदारी आहे. याबाबत शासनाकडून प्राप्त आदेश या कार्यालयाकडून दि 24/06/2025, दि 15/07/2025, दि. 01/08/2025 आणि 08/10/2025 रोजी व्हाट्स अप ग्रुप आणि ब्लॉग वर कळविण्यात आलेले आहेत. 
तथापि अद्यापही अनेक शाळा स्पर्धेला येताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करताच खेळण्यासाठी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी येऊन ते आयोजक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी विनाकारण वाद घालत आहेत. स्पर्धेसाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आणि अनिवार्य आहेत ती कळवूनही ते खेळाडू / संघ कागदपत्रे न आणताच खेळण्यासाठी येत आहेत. वरील नमूद तारखाना सूचना देऊन बराच कालावधी झालेला आहे. अशा परिस्थिती मध्ये कागदपत्रे घेऊन न येता ती मिळतच नाहीत अशी कारणे काही शाळा देत असल्याचेही दिसून येत आहे. वा
त्या अनुषंगाने सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांना पुन्हा एकदा आदेशीत करण्यात येते की खालील नमूद कागदपत्रे ही शालेय स्पर्धेच्या सर्व स्तरावर आवश्यक / अनिवार्य केलेली आहेत. ही कागदपत्रे जर नसतील तर अशा खेळाडूंना मग तो वैयक्तिक अथवा सांघिक खेळात भाग घेत असेल त्याला त्या खेळात खेळवू नये. ज्या खेळाडूंची कागदपत्रे परिपूर्ण आहेत त्यांनीच स्पर्धेत सहभागी व्हावे. शालेय क्रीडा स्पर्धेतील सर्व स्तरावर खालील कागदपत्रे आवश्यक / अनिवार्य आहेत.
1. संबंधित खेळाडूचा शासकीय विभागाने वितरित केलेला मुळ जन्म दाखला.
2. मूळ आधारकार्ड.
3. खेळाडूने पहिल्या इयत्तामध्ये ज्या शाळेत प्रवेश घेतला होता त्या शाळेच्या जनरल रजिस्टर च्या नोंदवहीची सत्यप्रत अनिवार्य आहे. जर पहिल्या इयत्तेची जनरल रजिस्टर च्या नोंद वहीची सत्यप्रत नसल्यास भारतीय खेळ महासंघ यांनी निर्देशीत केलेली वय चाचणी (Age Verification Test) अनिवार्य आहे. 
सर्व क्रीडा शिक्षकांना विनंती आहे की तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाताना वर नमूद कागदपत्रे अनिवार्य आहेत आणि ती पूर्ण असतील तरच खेळाडूंना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सांगावे.

No comments:

Post a Comment