Wednesday, October 15, 2025

जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा २०२५-२६

*जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर व मुंबई  किक बॉक्सिंग असोसिएशन (वाको मुंबई), मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा २०२५-२६* 

*स्पर्धेसाठी वजन घेणे / तपासणी.*

*दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवारी)*
सकाळी *१०:०० ते १२:००*  - १४ वर्षाखालील मुले आणि मुली.
दुपारी *१२:०० ते ०२:००* - १७
वर्षाखालील मुले आणि मुली.
दुपारी *०२:०० ते ०४:००* - १९ वर्षाखालील मुले आणि मुली.

*दिनांक - २५ ऑक्टोबर २०२५ (शनिवार)*
वेळ - सकाळी ०९:००
*१४, १७, १९ वर्षाखालील सर्व मुली यांची स्पर्धा*

*दिनांक – २६ ऑक्टोबर २०२५ (रविवार)*
वेळ - सकाळी ०९:००
*१४, १७, १९ वर्षाखालील मुले यांची स्पर्धा*

*स्थळ* :- *गुंदवली मुंबई पब्लिक स्कूल, नटराज स्टुडिओ, बिमा नगर, अंधेरी पूर्व, मुंबई.*

*स्पर्धेचे स्वरूप आणि आयोजन*:

*महत्त्वाची सूचना :*

*१) खेळाडूने वेळेनुसार उपस्थित राहावे आणी आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत ठेवावे.*

*२) खेळाडूंनी वैयक्तिक क्रीडा सामुग्री - किकबॉक्सिंग गणवेश(राऊंड नेक टी शर्ट आणि खिसा व झिप नसलेले ट्रॅक पँट), बॉक्सिंग ग्लोव्हज, हेड गार्ड, शिन पॅड, माउथ गार्ड, हॅण्ड रॅप, सेंटर गार्ड (मुलांसाठी) असणे आवश्यक आहे त्याशिवाय खेळाडूस खेळता येणार नाही.*

*३) आपले क्रीडा साहित्य,व मौल्यवान वस्तू स्वतः सांभाळाव्यात हरवल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.*

*४) पी. टी. शिक्षक व शाळेचे प्रतिनिधी यांनी शाळेचे ओळखपत्र अथवा प्रतिनिधी पत्र सोबत आणणे बंधनकारक आहे अन्यथा स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.*

*५) खेळाडू स्पर्धेच्या दिवशी वैद्यकीयदृष्ट्या स्वस्थ असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास तो खेळाडू खेळू शकणार नाही.*

*६) स्पर्धेच्या ठिकाणी फक्त खेळाडू , क्रीडा शिक्षक व स्पर्धा आयोजक समितीच्या सदस्यानांच प्रवेश राहील.*

*७) स्पर्धेच्या दिवशी व ठिकाणी नवीन वजन घेतली जाणार नाहीत.*

*८) पंचाचा आणि आयोजन समितीचा निर्णय अंतिम राहील. तसेच आयोजन समिती आणि पंच यांच्याशी कोणताही वाद कोणत्याही कारणास्तव घातल्यास तो संघ, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांच्यावर कडक शिस्तभंगाची कार्यवाही करून त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.*

*९) स्पर्धेबाबत आवश्यक त्या सुचना Player ID वर मुख्याध्यापक/प्राचार्य यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असणे आवश्यक आहे.*


*🔸1. जन्म प्रमाणपत्र ( १ ते ५ वर्षाचा आतील ) (Birth Certificate)*
*🔸2. आधार कार्ड (Aadhar Card)*
*🔸 3 . इयत्ता १लीत प्रवेशाचा शाळेच्या जनरल रजिस्टरचा फोटो-कॉपी*

*खेळाडूचे सर्व ओळखपत्र असणे अनिवार्य आहे, संबंधित क्रीडा शिक्षकांनी याची नोंद घ्यावी, अन्यथा स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभाग करण्यात येणार नाही.*

* *स्पर्धेमधील काही बदल असल्यास वेळोवेळी या ग्रुप वर तसेच खालील ब्लॉग वरती टाकण्यात आली आहे*
https://www.dsomumbaisub.blogspot.com 

*स्पर्धा नियोजक प्रमुख*
*श्री. विशाल सिंह* - *७६६६५८४८५४*
*वाको मुंबई - अध्यक्ष*

*स्पर्धा प्रमुख*
 *श्रीमती. प्रिती टेमघरे* 
*९०२९२५०२६८*
*( क्रीडा कार्यकारी अधिकारी )*

No comments:

Post a Comment