जिल्हास्तर शालेय जलतरण, डायव्हिंग आणि वॉटरपोलो स्पर्धा २०२३-२४ अत्यंत महत्त्वाचे
जिल्हास्तर शालेय जलतरण, डायव्हिंग व वॉटरपोलो स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. जलतरण, डायव्हिंग व वॉटरपोलो या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ११/०९/२०२३ सकाळी १०.३० ते २५/०९/२०२३ दुपारी ०२.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. सदर जिल्हास्तर स्पर्धा (संभाव्य तारखा) आक्टोबर २०२३ पहिला आठवडयामध्ये होणार आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
No comments:
Post a Comment