Monday, September 25, 2023

जिल्हास्तर शालेय १९ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४

 

जिल्हास्तर शालेय १९ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४

 

          जिल्हास्तर शालेय१९ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा दि. २५/०९/२०२३ पासुन आझाद, क्रॉस, ओव्हल मैदान, मुंबई येथे संपन्न होणार होती. तथापि, सततच्या पडणा-या पावसामुळे मैदानावरील खेळपट्टया खेळण्या योग्य आढळुन येत नाहीत.

            यास्तव १९ वर्षाखालील मुले क्रिकेट ही स्पर्धा आता दि. ०३/१०/२०२३ रोजी आझाद, क्रॉस, ओव्हल मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.  ज्या शाळांनी प्लेअर आय डी अपलोड केले आहेत त्यांचीच नावे केवळ स्पर्धेच्या ड्रॉमध्ये घेण्यात आलेली आहेत. या वयोगटाचे ड्रॉ दि. १९/०९/२०२३ रोजीच ब्लॉग आणि व्हाटस अप ग्रुपवर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. त्यानुसार A, B, C, D या गटातील सर्व संघांनी दि. ०३/०१०/२०२३ रोजी कर्नाटक स्पोर्टस असोसिएशन मैदान, सी.एस.टी.एम. मुंबई येथे उपस्थित राहावे. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना स्वत:चा एक नवा आणि एक जुना बॉल घेऊन यावा. तसेच स्पर्धेसाठी खेळाडुंकडे पांढरा ड्रेस आवश्यक आहे. आणि स्पर्धेला येताना संघानी प्रथमोचार साहित्य सोबत ठेवावे.  तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

स्पर्धेसाठी संपर्क -: श्री पापा सर आझाद मैदान -९००४२५४४२५ आणि श्री संदीप सर -८३६९७३१८७२

No comments:

Post a Comment