Wednesday, September 6, 2023

ऑन लाईन प्रणालीबाबत - महत्त्वाच्या सुचना

 

१) सर्व क्रीडा शिक्षक बंधु भगिनींना विनंती आहे की, मुंबई विभागातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक प्रवेशिकेच्या ऑन लाईन एन्ट्री सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे काही वेळेस सर्व्हरवर अधिक लोड येतो. अशा वेळी शाळांनी प्राथमिक प्रवेशिका भरुन फी भरताना शाळेने एकदा फी भरल्यानंतर ती जर पेंडिंग / डयु दाखवत असेल तर काही काळ थांबावे. अनेक शाळा लगेचच पुन्हा पेमेंट करण्याची घाई करीत आहेत. यासाठी आपण काही काळ पहिल्या पेमेंटबाबत खात्री करुनच पुन्हा पेमेंट करावे.

२) INTERNAL SERVER ERROR. PLEASE TRY AGAIN LETTER असा मेसेज येत असेल तर -:

तसेच ब-याच शाळांनी त्यांच्या स्कुल प्रोफाईलमध्ये शाळेचा ई मेल अपलोड करताना हायपन / अंडरस्कोर / स्लॅश / डॉट / स्पेशल कॅरेक्टर इ. दिलेले असतील तर त्यांनी शाळेचा नॉर्मल ई मेल तयार करुन स्कुल प्रोफाईलमधील एडिट ऑप्शन मध्ये जाऊन टाकावा. तसेच काही शाळांकडुन अनावधानाने क्रीडा शिक्षक / शाळा अथवा मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे मोबाईल क्रमांक जे १० डिजीटचे आहेत ते १० पेक्षा जास्त टाकले गेल्याचे आढळुन येत आहेत. ते मोबाईल क्रमांक १० डिजीटचे करावेत.

३) याशिवाय आपणास प्रायमरी फॉर्म भरताना / पेमेंट करताना अथवा स्पर्धा विषयक कामकाजासाठी इतर काही तांत्रिक अडचणी येत असल्यास श्री. मनिष सर ७३०५९९२२८१ आणि श्रीमती दिशा मॅडम ७२०००९९१७४ यांच्याशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेतच संपर्क साधुन आपली अडचण सोडवावी. या व्यक्तींशी केवळ आपली तांत्रिक अडचण सोडवण्यासाठीच संपर्क करावा. मुदतवाढ वाढवुन घेणे, वयोगट बदलणे, नविन प्रवेश करणे इ. कामासाठी त्यांना आणि कार्यालयामधील अधिकारी कर्मचारी यांना फोन, मेसेज करु नयेत.

४) सर्वांना विनंती आहे की, अनेक खेळांच्या खेळाडु प्रवेशिकाही सुरु झालेल्या आहेत. कृपया सर्वांनी विहीत मुदतीतच त्या त्या खेळाच्या खेळाडूंच्या आय डी भरण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच ऑन लाईन प्रणाली हाताळताना काही अडचणी येत असतील तर त्या प्रथम आपल्या तालुक्यातील / जिल्हयातील शिक्षक बंधु भगिनींशी चर्चा करुन सोडवाव्यात अशी विनंती आहे. तसेच ऑन लाईन प्रणाली कशी हाताळावी याबाबतचे व्हिडीओ व्हाटस अप ग्रुप मध्ये या अगोदरच देण्यात आलेले आहेत. जर आपणाकडे ते नसतील तर ते इतरांकडुन घेऊन त्यामध्ये दिलेल्या विहीत पध्दतीनेच ऑन लाईन प्रणालीमध्ये कामकाज करण्यात यावे.

No comments:

Post a Comment