Thursday, September 14, 2023

जिल्हास्तर शालेय १९ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४

 

जिल्हास्तर शालेय १९ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४

 

          जिल्हास्तर शालेय१९ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा दि. २५/०९/२०२३ पासुन आझाद, क्रॉस, ओव्हल 

मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडु आय डी भरण्याची ऑनलाईईन प्रवेशिका ०४ सप्टेंबर ते 

१८ सप्टेंबर २०२३ ही आहे. या कालावधीमध्ये शाळा महाविदयालयांनी खेळाडु अपलोड करावेत. कोणत्याही 

कारणासाठी प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही आणि ज्या शाळांनी प्लेअर आय डी 

अपलोड केले असतील त्यांचीच नावे केवळ स्पर्धेच्या ड्रॉमध्ये घेण्यात येतील.  तसेच स्पर्धेच्या वेळापत्रकाप्रमाणे संघांनी 

स्पर्धेसाठी उपस्थित राहावे. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना / संघांना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार

 नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच शाळांनी स्पर्धेच्या ठिकाणी संघाचे नाव अपलोड केल्याची खात्री करुनच 

यावे. याबाबत स्पॉट एन्ट्री घेतली जाणार नाही. आणि याबाबत आयोजकांशी कोणताही वाद घालु नये. तसेच 

वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना 

स्वत:चा एक नवा आणि एक जुना बॉल घेऊन यावा. तसेच स्पर्धेसाठी खेळाडुंकडे पांढरा ड्रेस आवश्यक आहे. आणि 

स्पर्धेला येताना संघानी प्रथमोचार साहित्य सोबत ठेवावे.  स्पर्धेचे ड्रॉ १८/०९/२०२३ नंतर ब्लॉग आणि व्हाटस 

ग्रुपवर टाकण्यात येतील. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक

 आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.


No comments:

Post a Comment