Wednesday, October 25, 2023

जिल्हास्तर बॉक्सींग स्पर्धा २०२३-२४ स्पर्धा कार्यक्रम

 

जिल्हास्तर बॉक्सींग स्पर्धा २०२३-२४

 

         जिल्हास्तर बॉक्सींग स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी बॉक्सींग खेळाडुंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहेत आणि जे खेळाडु प्रत्यक्ष वजन आणि मेडिकल यासाठी  खालील वेळेप्रमाणे उपस्थित राहतील त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.

 

१) दिनांक ३०/१०/२०२३ -: १४ वर्ष मुले -: स्पर्धा नोंदणी, वजन आणि मेडिकल सकाळी ०९.०० ते ११.००

                                       १७ मुले व मुली -:  स्पर्धा नोंदणी, वजन आणि मेडिकल सकाळी ११.०० ते ०१.००

                                        १९ मुले व मुली -: स्पर्धा नोंदणी, वजन आणि मेडिकल सकाळी ०२.०० ते ०४.००

                                         यानंतर स्पर्धेचे ड्रॉ तयार करुन पाठविण्यात येतील.

२) प्रत्यक्ष स्पर्धा दिनांक ३१ आक्टोबर ते ०४ नोव्हेंबर २०२३ हया कालावधीमध्ये संपन्न होईल.

 

स्पर्धा ठिकाण -: दहिसर स्पोर्टस फाऊंडेशन, विदया मंदीर हायस्कुल शाळेच्या विरुध्द बाजुस, जरीमरी गार्डन जवळ,  सी.एस. रोड, दहिसर पुर्व, मुंबई ४०००६८.

स्पर्धा संपर्क -: श्री शैलेश त्रिपाठी सर -९८३३५५५७५६

 

महत्वाची सूचना-: वैदयकीय दृष्ट्या तंदुरुस्त असणा-याच खेळाडुंनी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. आजारी अथवा इतर काही कारणांमुळे खेळाडू खेळण्यास सक्षम नसेल तर स्पर्धेमध्ये भाग घेऊ नये. तसेच स्पर्धेसाठी आवश्यक सर्व साहित्य खेळाडूंनी स्वत: घेऊन यावे. याशिवाय शाळेने स्वत:ची प्तथमोपचार पेटीही स्पर्धा कालावधीमध्ये स्वत:जवळ ठेवावी. स्पर्धा कालावधीमध्ये खेळाडूस काही जखम, गंभीर दुखापत, जिवित हानी झाल्यास आयोजन समिती त्यास जबाबदार राहणार नाही. याशिवाय स्पर्धा कालावधीमध्ये खेळाडुंच्या वयोगट आणि वजनगटानुसार ज्या ज्या दिवशी सामने असतील त्या त्या दिवशी तेवढेच खेळाडु स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. तांत्रिक कारणासाठी आयोजकांशी वाद घातल्यास त्या खेळाडू आणि शाळेवर योग्य ती कठोर कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी स्पष्टपणे नोंद घ्यावी.

स्पर्धा नोंदणी, वजन आणि वैदयकीय तपासणी तसेच संपुर्ण स्पर्धा कालावधी यासाठी खेळाडुने स्वत:चे प्लेअर आय डी जवळ ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय त्या प्लेअर आय डी वर शाळेच्या मुख्याध्यापकांची / प्राचार्यांची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment