जिल्हास्तर शालेय १७ आणि १९ वर्षाखालील मुली फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४
दिनांक १७/१०/२०२३ रिपोर्टिंग सकाळी ८.३० वाजता ससानियन क्रिकेट क्लब, आझाद मैदान, मुंबई.
ज्या शाळांनी प्लेअर आय डी अपलोड केले असतील त्यांचीच नावे केवळ स्पर्धेच्या ड्रॉमध्ये घेण्यात येतील. तसेच स्पर्धेच्या वेळापत्रकाप्रमाणे संघांनी स्पर्धेसाठी उपस्थित राहावे. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना / संघांना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. स्पॉट एन्ट्री घेतली जाणार नाही. आणि याबाबत आयोजकांशी कोणताही वाद घालु नये. तसेच वेळापत्रकामध्ये आणि सामन्यांच्या स्वरुपात बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना स्वत:चा एक नवा आणि एक जुना बॉल घेऊन यावा. याशिवाय एक दोन अतिरिक्त बॉल संघानी स्वत:जवळ ठेवावेत. तसेच स्पर्धेसाठी खेळाडुंकडे पांढरा ड्रेस आवश्यक आहे. आणि स्पर्धेला येताना संघानी प्रथमोचार साहित्य सोबत ठेवावे. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.
स्पर्धेसाठी संपर्क - श्री पापा सर ९००४२५४४२५ आणि श्री. संदीप सर -: ८३६९७३१८७२
No comments:
Post a Comment