जिल्हास्तर शालेय रोलबॉल स्पर्धा २०२३-२४
मुंबई उपनगर
जिल्हास्तर शालेय रोलबॉल स्पर्धा दिनांक ०७/१०/२०२३ रोजी राजहंस विदयालय, अंधेरी
पश्चिम, मुंबई येथे होणार आहेत. स्पर्धेसाठी सर्व वयोगटामधील संघांनी सकाळी ०८.००
वाजता स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थिती नोंदवणे आवश्यक राहील. स्पर्धेसाठी आवश्यक
पोषाख, साहित्य व प्रथमोपचार पेटी संघानी घेऊन यावे. तसेच स्पर्धेला येणा-या सर्व
खेळाडूंची ओळखपत्रे असणे आवश्यक आहे. तसेच त्या ओळखपत्रावर खेळाडूची स्वाक्षरी,
मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही शिक्का आवश्यक आहे. स्पर्धेच्या
वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीकडे असतील.
स्पर्धेसाठी संपर्क -: श्री महेंद्र जायभाय सर - ८१६९६८९६०३
No comments:
Post a Comment