उपरोक्त विषयान्वये सन २०२३-२४ या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडील बहुतांश खेळांच्या जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन संपन्न झालेले आहे. ज्या जिल्हास्तर स्पर्धा राहिलेल्या आहेत त्यांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय मुंबई उपनगर जिल्हयाकडे ज्या खेळांच्या विभागस्तर स्पर्धेची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या स्पर्धाही बहुतांश आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हयाप्रमाणेच मुंबई विभागामधील इतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांकडे विभागस्तर आणि काही राज्यस्तर स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामधील ज्या ज्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांकडे राज्यस्तर स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे अशा काही खेळांच्या राज्यस्तर स्पर्धा हया दिवाळी सुट्टीपुर्वी काही दिवस अथवा दिवाळी सुट्टीमध्ये असण्याची शक्यता आहे. याबाबत राज्यस्तर स्पर्धा आयोजक जिल्हयाकडुन सविस्तर स्पर्धा परिपत्रक प्राप्त होताच आपणास अवगत करण्यात येईल.
तथापि, खालील खेळांच्या राज्यस्तर स्पर्धा जर दिवाळीच्या सुट्टीमध्ये जाहीर झाल्यास आणि आपल्या शाळेच्या संघांची विभाग अथवा राजस्तर स्पर्धेसाठी निवड झाली असल्यास मुंबई उपनगर जिल्हयामधील शाळा कनिष्ठ महाविदयालयांनी असा खेळाडूंचे आणि संघांचे वैयक्तिक संपर्क क्रमांक त्यांच्याजवळ दिवाळी सुट्टी सुरु होण्यापुर्वीच घेऊन ठेवावेत. या सुट्टीमध्ये विभागस्तर अथवा राज्यस्तर स्पर्धेबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास माहिती प्राप्त होताच सदर माहिती व्हाटस ग्रुप आणि www.mumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर टाकण्यात येईल. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांनी यापुर्वीही अनेकदा शाळा कनिष्ठ महाविदयालयांना आवाहन केले आहे आहे की, त्यांनी आपल्या शाळा – कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थांना आणि पालकांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ब्लॉगबाबत माहिती दयावी जेणेकरुन विदयार्थी आणि पालक यांनाही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित स्पर्धा आणि इतर सर्व कार्यक्रम यांची माहिती विहीत वेळेमध्ये मिळू शकेल. यास्तव सर्व क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यांनी वरील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कार्यवाही करावी आणि दिवाळी सुट्टीमुळे कोणताही खेळाडू अथवा संघ राज्यस्तर स्पर्धेपासुन वंचित राहु नये याबाबत दक्षता घ्यावी अशी विनंती आहे.
स्केटिंग ची जिल्हा स्तरीय DSO dates kadhi aahet..
ReplyDeleteWhen will DSO under 14 cricket tournament start
ReplyDelete